मुंबईत शिवसेना आणि शिंदेगट आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी

प्रभादेवी परिसरात सार्वजनिक मिरवणूक आली असता शिंदे गटाच्या प्रियाताई सरवणकर ह्या देखील तिथे उपस्थित होत्या. मात्र, या ठाकाणी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्वकाही शांततेत असून मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला जात असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. शिवाय येथील गर्दी पाहून पोलीस बंदोबस्त वाढवला असेल असे म्हणत येथे प्रभादेवी परिसरात काही झालेच नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबईत शिवसेना आणि शिंदेगट आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी
प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिदे गटाचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले होते.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 10:32 PM

मुंबई : (Mumbai) मुंबईत सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मिरवणूका ह्या शांततेत होत असताना प्रभादेवी परिसरात (Shiv sena) शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले होते. संजय भगत आणि समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले होते. समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव..म्याव अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावरुन वातावरण तापले होते. त्यानंतर मात्र, दोन्ही गटात (Sloganeering) घोषणाबाजी झाली. घटनेची माहिती मिळताच प्रभादेवी परिसरात पोलीस बंदोबस्ताही वाढवण्यात आला होता. शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे एकमेकांच्या समोरा-समोर आल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

म्याव..म्याव म्हणून डिवचण्याचा प्रयत्न

प्रभादेवी परिसरात विसर्जन मिरवणूक असतानाच शिंदे गटातील पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे समोरा-समोर आले होते. दरम्यान, शिंदे गटातील कार्यकर्ते हे म्याव..म्याव असा आवाज काढत असल्याचे समोर आले आहे. पण उपस्थित पोलीसांमुळे अधिकचा गोंधळ झाला नाही.

उपस्थितांचे म्हणणे काय?

प्रभादेवी परिसरात सार्वजनिक मिरवणूक आली असता शिंदे गटाच्या प्रियाताई सरवणकर ह्या देखील तिथे उपस्थित होत्या. मात्र, या ठाकाणी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्वकाही शांततेत असून मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला जात असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ

गर्दी पाहून पोलीस बंदोबस्त वाढवला असेल असे म्हणत येथे प्रभादेवी परिसरात काही झालेच नसल्याचे येथील उपस्थितांनी सांगितले. रात्रीच्या वेळी गणेश भक्तांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे आता पोलीसांची संख्याही प्रभादेवी परिसरात वाढलेली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.