AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv sena : निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, बाजू मांडण्यासाठी फक्त 15 दिवसांची वेळ

शिवसेनेचं चिन्ह कुणाचं हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर पोहोचला आहे. तसेच हा वाद सध्या कोर्टातही सुरू आहे. यावरती निर्णय होणं मात्र अद्याप बाकी आहे. ही अटीतटीची लढाई कोण जिंकणार? याकडे संपूर्ण देशाचा लक्ष लागलं आहे.

Shiv sena : निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, बाजू मांडण्यासाठी फक्त 15 दिवसांची वेळ
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Aug 11, 2022 | 7:59 PM
Share

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बसणारे हादरे सध्या सुरूच आहेत. अशातच होता निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) त्यांना आणखी एक मोठा हादरा दिला आहे. ठाकरेंना आपली बाजू निवडणूक आयोगासमोर मांडण्यासाठी चार आठवड्यांचा नाही तर केवळ पंधरा दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता त्यांना सर्व पुराव्यांशी बाजू मांडण्यासाठी फक्त 23 ऑगस्ट पर्यंतचा वेळ असणार आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेचं चिन्ह कुणाचं हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर पोहोचला आहे. तसेच हा वाद सध्या कोर्टातही (Supreme Court) सुरू आहे. यावरती निर्णय होणं मात्र अद्याप बाकी आहे. ही अटीतटीची लढाई कोण जिंकणार? याकडे संपूर्ण देशाचा लक्ष लागलं आहे.

फक्त पंधरा दिवसांची मुदत

सध्या ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू असल्यामुळे सुप्रीम कोर्टातील निकाल लागेपर्यंत शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी विनंती ठाकरेंकडून करण्यात आलेली आहे. शिवसेनेकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली गेली होती, मात्र शिवसेनेचे ही मागणी धुडकावून लावत निवडणूक आयोगाने फक्त दोन आठवडे म्हणजेच पंधरा दिवसाची मुदत शिवसेनेला दिलेली आहे.

काय सिद्ध करावं लागणार?

यामध्ये शिवसेनेला लोकसभा, विधानसभा आणि शिवसेनेच्या राजकीय पक्ष रचनेत कुणाकडे बहुमत आहे हे सिद्ध करावे लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि नवं सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील आमदारांना शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी असं पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं. हे पत्र एकनाथ शिंदे यांनी 19 जुलै 2022 ला पाठवलं होतं. त्याच्यावरतीच शिवसेनेकडून बाजू मागवण्यात आलेली आहे.

मागच्या वेळी कुणाच्या निवडी कशा?

2018 मधील कार्यकारणीत उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदी निवड करण्यात आली होती. तर एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभेत सरकार स्थापन झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र आता शिवसेनेतच उभे फूट पडल्याने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कुणाचं? आणि कायदेशील व्हीप नेमका कुणाचा? हा वाद निर्माण झाला आहे आणि त्यावर निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा आहे.

दोन तारखा ठाकरेंसाठी महत्वाच्या

या वादाबाबत ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टातही धाव घेण्यात आलीय. या वादात त्यांनी एक नाही दोन नाहीतर तब्बल पाच याचिका दाखल केल्या आहेत. त्याच्यावरती ही सुनावणी पार पडत आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ही 22 ऑगस्टला पार पडणार आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट या दोन तारखा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेतय

18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट
18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट.
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया.