Shiv Sena : एकनाथ शिंदे नक्की मुख्यमंत्री आहेत का?, दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला फक्त फडणवीस कसे?; मनिषा कायंदे यांचा सवाल

| Updated on: Jul 25, 2022 | 12:21 PM

Shiv Sena : मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर राजीनामा देऊन निवडणुका लढवू, असं बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं. त्यालाही कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुका म्हणजे सगळ्यांसाठी खुलं मैदान असतं. शिवसैनिकांमुळे हे आमदार निवडून आलेलं आहेत.

Shiv Sena : एकनाथ शिंदे नक्की मुख्यमंत्री आहेत का?, दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला फक्त फडणवीस कसे?; मनिषा कायंदे यांचा सवाल
शिवसेना नेत्या मनीषा कायंदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या अध्यक्षतेखाली काल भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना न बोलावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (manisha kayande) यांनीही या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेला डिवचले आहे. एकनाथ शिंदे नक्की मुख्यमंत्री आहेत का? की नावालाच मुख्यमंत्री आहेत? जर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर मग भाजपच्या दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला फक्त देवेंद्र फडणवीसच कसे? असा सवाल करत मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे गटाला डिवचले आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना छोट्याछोट्या गोष्टींसाठी दिल्लीसमोर मान झुकवावी लागते. वारंवार दिल्लीत जावं लागतं. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत. त्यामुळे भाजप-शिंदे गटात नेमकं काय चाललंय हे दिसून येतंय, असा टोलाही कायंदे यांनी लगावला आहे.

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माईक खेचताना आणि चिठ्ठी देताना सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलं आहे. त्यामुळे सरकारचा कारभार कसा आहे हे वेगळं सांगायला नको, असं सांगतानाच शिंदे गटाचा उठाव नसून कट आहे. हा कट संपूर्ण महाराष्ट्राला कळला आहे, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

मग काँग्रेसमधून का नाही लढले?

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर राजीनामा देऊन निवडणुका लढवू, असं बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं. त्यालाही कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुका म्हणजे सगळ्यांसाठी खुलं मैदान असतं. शिवसैनिकांमुळे हे आमदार निवडून आलेलं आहेत. आपल्यामुळे जग चालत असं वाटतं असेल तर चूक आहे. शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंमुळे सत्तार जिंकले. अब्दुल सत्तारांची एवढी ताकद होती तर मग अब्दुल सत्तार काँग्रेसकडून का उभे राहिले नाही?, असा सवाल त्यांनी केला.

जनतेने उद्धव ठाकरेंना स्वीकारलं, इतरांना नाही

यावेळी त्यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरही टीका केली. मनसेने बाळासाहेबांचे विचार पुढे नेले असं सांगता मग जनतेनं यांना का निवडून दिलं नाही? उद्धव ठाकरेनी स्वत:ला सिद्ध केलं. जनतेनं त्यांना स्विकारलं. इतरांना नाही, असा चिमटा त्यांनी देशपांडेंना लगावला.

भाजपला धडकी भरली म्हणून चौकशी

अदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रमुळे भाजपला धडकी भरली आहे. पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेनी भरीव काम केलं आहे. चांगलं काम केलं आहे. ते पुसायचं कसं ही भाजपची पोटदुखी आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे मंत्री असलेल्या पर्यटन आणि पर्यावरण विभागाची आता केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे. राजकारणात शत्रूत्व नसते. विरोधक विरोधकांचे काम करत असतात. मोठ्या प्रमाणात रडीचे राजकारण केले जात आहे. आदित्य योग्य उत्तरं देतील घाबरणार नाहीत, असं त्या म्हणाल्या.