मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला? पवार-ठाकरे यांच्यात खलबतं नेमकी काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार असल्याचे संकेत वर्तवण्यात येत आहेत. अर्थात हे संकेत कितपत खरे ठरतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण महाविकास आघाडीच्या गोटात सध्याच्या घडीला नेमक्या काय घडामोडी घडत आहेत ते देखील महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी नुकतंच मुख्यमंत्री पदाचा दावा आपण आताही करु शकतो, असं वक्तव्य केलंय.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला? पवार-ठाकरे यांच्यात खलबतं नेमकी काय?
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 8:36 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्याच्या घडीला नेमक्या काय घडामोडी घडत आहेत ते जास्त महत्त्वाचं आहे. राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाण्याची चर्चा रंगू लागली. हे कितपत खरंय याबाबत अद्याप शाश्वती नाही. पण राजकारणात गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या फक्त मुख्यमंत्रीपदासाठीच्या संघर्षामुळेच घडल्या आहेत. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. पण भाजप पक्षही मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची पारंपरिक युती तुटली आणि गेल्या साडेतीन वर्षात अनेक घडामोडी घडल्या. पण आता या सगळ्या घडामोडींनंतर ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच एक बैठक पार पडली. उद्धव ठाकरे हे खासदार संजय राऊत यांच्यासह शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी गेले होते. यावेळी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती संजय राऊत यांनी ‘सामना’ वृत्तापत्राच्या ‘रोखठोक’ सदरातून दिली. पवार कुटुंबातील व्यक्तींना केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन दबाव टाकला जात असल्याची माहिती पवारांनी ठाकरेंना सांगितली, असं लेखात म्हटलंय. पण याच बैठकीतला एक महत्त्वाचा मुद्दा शिवसेनेच्या नरेश म्हस्केंनी सांगितला.

‘तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहीलं धुपाटणं’

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली तेव्हा ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. “उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटले. त्यांनी शरद पवारांना सांगितलं की, आमच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा आम्ही मागे घेतोय. तुम्ही कुणालाही मुख्यमंत्री करा. आम्ही आमचा मुख्यमंत्रीपदाचा दावा मागे घेतोय, असं ठाकरे म्हणाले”, असा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

“ही शोकांतिका आहे. ज्या मुख्यमंत्रीपदाकरता बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व, विचार, हिंदुत्व यांनी सोडून दिलं. ती मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही गेली. आता जो काही शिवसेनेचा ठसा होता, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावाही सोडला आहे. त्यामुळे तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणं राहीलं, अशी यांची परिस्थिती झालीय”, असा घणाघात नरेश म्हस्के यांनी केला.

“जे काही वक्तव्ये होत आहेत ते काल्पनिक आहेत. हो, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप तर होणार आहेच. पण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उरलेले शिवसेनेचे 15 आमदार आणि तीन-चार खासदार यापैकी अनेक लोकप्रतिनिधी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीला पाठिंबा देणार आहेत. तुम्ही त्यांची एक-दोन दिवसातील वक्तव्ये बघा”, असादेखील दावा नरेश म्हस्के यांनी केला.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.