AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : एवढा मोठा गट, एवढा मोठा भाजप, एवढं मोठं बहुमत, मग मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही?; राऊतांचा सवाल

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीचं अस्तित्व उरलं नाही, असा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. त्यावरही त्यांनी पलटवार केला. आघाडीचं अस्तित्व येणारा काळ ठरवेल. शिवसेना, महाविकास आघाडी यांची ताकद, त्यांचं महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल.

Sanjay Raut : एवढा मोठा गट, एवढा मोठा भाजप, एवढं मोठं बहुमत, मग मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही?; राऊतांचा सवाल
एवढा मोठा गट, एवढा मोठा भाजप, एवढं मोठं बहुमत, मग मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही?; राऊतांचा टोलाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 18, 2022 | 11:03 AM
Share

नवी दिल्ली: पंधरा दिवस उलटून झाले तरी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावर शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. ते काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका. मी काय म्हणतोय ते समजून घ्या. दोन जणांचं मंत्रिमंडळ 15 दिवसांपासून चाललंय. जगामध्ये लोकशाहीची एवढी चेष्टा कधी झाली नव्हती. प्रश्न एवढाच आहे की, एवढा मोठा तुमचा गट, एवढा मोठा भाजपा(bjp), इतकं मोठं बहुमत. मग मंत्रिमंडळ का इतक्या दिवसात स्थापन झालं नाही?, असा सवाल संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. भविष्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी दिसते. अपात्रतेची टांगती तलवार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, असा दावाही राऊत यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

राज्यात महाविकास आघाडीचं अस्तित्व उरलं नाही, असा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. त्यावरही त्यांनी पलटवार केला. आघाडीचं अस्तित्व येणारा काळ ठरवेल. शिवसेना, महाविकास आघाडी यांची ताकद, त्यांचं महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल. ते एखाद दुसरा नेता ठरवू शकत नाही. हे देशाची जनता ठरवेल. आज जे काय बुडबुडे फुटत आहेत, हवेत उडत आहेत. ते फार काळ राहणार नाहीत. हे तुम्हाला माहीत आहे. जनतेला माहीत आहे. भाजपच्या नेत्यांनाही माहीत आहे. तसं जर असतं तर 15 दिवसानंतर सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार जो टाळला जातोय तो टाळला गेला नसता, असं राऊत म्हणाले.

न्याय मेलेला नाही

अपात्र आमदारांच्या कोर्टातील याचिकेवरही त्यांनी भाष्य केलं. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जो कायदा, नियम आहे. त्यावरच आम्ही भरवसा ठेवून आहोत. सर्वोच्च न्यायालयात न्याय मेलेला नाही. अजूनही रामशास्त्री आहेत. याचं प्रत्यंतर भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेने असे निर्णय अनेकदा घेतले

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून शिवसेना संभ्रमात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. शिवसेना संभ्रमात नाही. शिवसेनेने अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदा घेतला नाही. एनडीएत असताना प्रतिभा पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला होता. एनडीएत असताना टीएन शेषण यांनाही पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर एनडीएत असताना प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आश्चर्य वाटण्याचं संभ्रमित होण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले. या देशातल्या अनेकांनी असा पाठिंबा दिला आहे. हेमंत सोरेन यूपीएमध्ये आहेत. त्यांनीही मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. इतर अनेकांनी दिला आहे. ते यूपीएत आहे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. आमचा पाठिंबा एका आदिवासी महिलेला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र