युतीसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे : संजय राऊत

युतीबाबत शिवसेना रिलॅक्स मोडमध्ये आहे. युतीसाठी मुहूर्ताची गरज नाही, लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेची युती झाली, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

युतीसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे : संजय राऊत

मुंबई : “युतीच्या घोषणेची दिरंगाई होऊ नये या मताचा मी आहे. अनेक ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते खोळंबले आहेत. 288 जागांचा विषय आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. युतीसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत”, असं शिवसेनेचे महत्त्वाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut TV9) यांनी सांगितलं. ते टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईक (Sanjay Raut TV9) या कार्यक्रमात बोलत होते.

युतीबाबत शिवसेना रिलॅक्स मोडमध्ये आहे. युतीसाठी मुहूर्ताची गरज नाही, लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेची युती झाली, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

युतीचा फॉर्म्युला अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी कॅमेऱ्यावर सांगितला आहे. 50-50 हा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना शब्दाला जागणारा पक्ष आहे. भाजपवर संघाचा प्रभाव ते शब्द पाळतील अशी आशा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

अमित शाह कालच्या भाषणात म्हणाले हो या न हो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, पण आम्ही म्हणतो काहीही होवो, युतीचा मुख्यमंत्री असेल, असं राऊत यांनी नमूद केलं.

युती अस्तित्त्वात आहे, जागा वाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलं. शिवसेना पूर्वी 171 जागा लढवत होती, बाळासाहेब ठाकरे दिलदारपणे भाजपला जागा सोडत होते. युतीची गरज नसती तर भाजपने लोकसभेवेळी युतीचा पाळणा हलवला नसता, पूर्वी ठरलं होतं दिल्लीत तुम्ही, महाराष्ट्रात आम्ही, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.

सत्तेत जाणे चूक होती

“आमच्या पक्षातील लोकांना कदाचित वाटत असेल सत्तेत जायला हवं, पण माझं व्यक्तीगत मत म्हणाल तर त्यावेळी 2014 मध्ये आम्ही सत्तेत गेलो नसतो, तर आजचं चित्र उलटं असतं. विरोधी पक्षात राहून संघर्ष करण्याचे फायदे अनेक असतात. 5 वर्ष संघर्ष करुन आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो असतो, तर नक्कीच त्याचा फायदा शिवसेनेला झाला असता. लोक मतदान करताना प्रबळ विरोधी पक्ष जो असतो, लढणार पक्ष जो असतो, त्याला पर्याय म्हणून स्वीकारतात हा माझा अनुभव आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *