Sanjay Raut | बाळासाहेबांनीच शिकवलंय, रडायचं नाही, सत्यासाठी लढायचं..! संजय राऊतांचं विरोधी पक्षनेत्यांना पत्र!

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संदय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. या दरम्यान त्यांच्याकडून विरोधी पक्षांसाठी एक पत्र पाठवण्यात आलं आहे. संकटकाळात साथ देणाऱ्या सर्व पक्षांचे त्यांनी आभार मानलेत. या प्ररकणात अखेर आपलाच विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Sanjay Raut | बाळासाहेबांनीच शिकवलंय, रडायचं नाही, सत्यासाठी लढायचं..! संजय राऊतांचं विरोधी पक्षनेत्यांना पत्र!
संजय राऊत, शिवसेना खासदारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 5:20 PM

मुंबईः बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) शिकवण आहे. शिवसैनिकांनी रडायचं नाही. सत्यासाठी लढायचं, त्यामुळे धीर सोडू नका. विजय आपलाच होणार आहे, अशा आशयाचं एक पत्र शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षांसाठी एक पत्र लिहिलं आहे. संकट काळातच आपल्यासोबत कोण आहेत आणि शुभचिंतक कोण आहे, हे कळतं, असं त्यांनी पत्रातून म्हटलंय. भाजप आणि केंद्र सरकारने आपल्याविरोधात राजकीय सूड नाट्य रचल्याचा आरोपही खासदार संजय राऊत यांनी या पत्रातून केला आहे. मात्र भाजपाच्या (BJP) या खेळीपुढे शिवसेना झुकणार नाही. ईडीच्या चौकशीमुळे शिवसेना नमतं घेणार नाही. मी शेवटपर्यंत लढणार असून कितीही दबाव आला तरी भिक घालणार नाही, असं आश्वासन संजय राऊत यांनी या पत्रातून दिलंय. तसेच या युद्धात अखेर आपलाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांना पाठवलेलं पत्र सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.

पत्रातून राऊत काय म्हणालेत?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रातून विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानलते. त्यांनी लिहिलंय, आयुष्याच्या सर्वात कठीण काळात आपले मित्र कोण असतात हे स्पष्ट होतं. सध्या माझ्याविरोधात सुरु असलेल्या राजकीय सूड नाट्यात तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे मी आभारी आहे. केंद्र सरकारतर्फे केंद्रिय तपास यंत्रणांद्वारे हेतु पुरस्सर चौकशी सुरु आहे. सत्यासाठी माझा लढा सुरुच राहिल. कितीही दबाव आला तरी लढा सुरु ठेवेन. मी दबावाला बळी पडणार नाही. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, रडायचं नाही, लढायचं.. सत्यासाठी लढायचं… या लढ्यात माझ्या पाठिशी शब्दांचं बळ देण्यात तसेच कृती आणि विचारसरणीतून पाठिशी राहण्यात तुम्ही साथ दिली. त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. संसदेत आणि संसदेबाहेर माझ्या पक्षाने मांडलेल्या भूमिकेशी तुम्ही सहमत राहिलात. काळ आणि संयम ही दोन प्रमुख शस्त्र असतात. हाच विचार आणि बाळासाहेब ठाकरेंची शिकवण तसेच उद्धव ठाकरे, माझे कुटुंबीय, हितचिंतकांच्या साथीने या लढाईत मी जिंकेन असा विश्वास आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा

आपला विश्वासू संजय राऊत

8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांना पाठवलेलं हे पत्र सध्या व्हायरल झालं आहे. संजय राऊतांविरोधातल्या संपूर्ण कारवाईदरम्यान त्यांनी शिवसेनेला समर्थन दिलं आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीतर्फे त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स आले असून त्यांचीही पुढील काही दिवसात चौकशी होणार आहे.

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.