AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खराब व्हेंटिलेटर्स मिळाले म्हणून थेट केंद्रावर आरोप, वाचा कोण आहेत खासदार श्रीकांत शिंदे?

वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले. | Shivsena MP Shrikant Shinde

खराब व्हेंटिलेटर्स मिळाले म्हणून थेट केंद्रावर आरोप, वाचा कोण आहेत खासदार श्रीकांत शिंदे?
श्रीकांत शिंदे, शिवसेना खासदार
| Updated on: May 15, 2021 | 4:23 PM
Share

मुंबई: पीएम केयर्स फंडातून महाराष्ट्राला पुरवण्यात आलेले अनेक व्हेंटिलेटर्स हे सदोष आहे. ते निम्म्या क्षमतेनेच काम करु शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नुकताच केला होता. केंद्र सरकारवर अशाप्रकारे थेट आरोप केल्यामुळे श्रीकांत शिंदे चांगलेच चर्चेत होते. (Shiv Sena MP Shrikant Shinde Political journey)

श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचे पूत्र आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. गेल्या साडेसहा वर्षांच्या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात बऱ्यापैकी जम बसवला आहे.

कोण आहेत श्रीकांत शिंदे?

श्रीकांत शिंदे यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1987 रोजी मुंबईत झाला. त्यांनी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ समाजकार्य केले. त्यानंतर 2014 मध्ये थेट लोकसभेच्या रिंगणात उतरून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. आपल्या साडेसहा वर्षांच्या काळात श्रीकांत शिंदे यांनी अनेक संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

‘पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स 50 टक्केच क्षमतेने काम करतात’

पंतप्रधान निधीतून कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध झालेले व्हेटींलेटर (ventilators) केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला होता. ही बाब खरी असेल तर रुग्णांच्या जीवितास धोका आहे. हे व्हेंटीलेटर 100 टक्के क्षमेतने चालणारे हवेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून चौकशी केली जावी, अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

श्रीकांत शिंदे अचानक भाजपच्या कार्यक्रमात पोहोचतात तेव्हा…

मध्यंतरी ठाण्यात श्रीकांत शिंदे यांच्याबाबत घडलेला एक किस्सा बराच गाजला होता. ठाण्यात श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्या तुलनेत श्रीकांत शिंदे यांना स्वत:चा म्हणावा तसा जम बसवता आलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी पत्री पुलाच्या उद्घाटनाच्या मुद्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये टोकाचे राजकारण रंगले होते. दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपली होती. अशा परिस्थितीत भाजपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला श्रीकांत शिंदे यांनी अचानक हजेरी लावली होती.

भाजपने कल्याणच्या पत्रीपुलाजवळ नवीन पूल आणि पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाला नामकरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम स्थानिक भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. या चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाव देण्यात आले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रम सुरू असताना अचानक शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी माईक हातात घेऊन चौका संदर्भात भाषण दिले. मला बोलावले नसले तरी मी आलो. सोशल डिस्टन्सिंग किती जरी असली तरी एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवू नका, असं आवाहन त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले होते.

दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळंच निगेटिव्ह; श्रीकांत शिंदे-संभाजीराजेंमध्ये शाब्दिक युद्ध

शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईवरुन खासदार छत्रपती संभाजीराजे (MP sambhaji raje) यांनी टीका केल्यानंतर वादंग निर्माण झाला होता. ही रोषणाई शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फंडातून करण्यात आली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या टीकेनंतर श्रीकांत शिंदे नाराज झाले होते.

त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनीही संभाजीराजे यांना प्रत्युत्तर दिले होते. दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला होता.

यानंतर संभाजीराजे यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. रायगड किल्ल्यावरील विद्युत रोषणाईसंदर्भात मी टीका केल्यानंतर अनेक शिवभक्तांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मी तेव्हा पुरातत्व खात्याला फटकारले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांना धारेवर धरण्याचा प्रश्नच येत नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले होते.

(Shiv Sena MP Shrikant Shinde Political journey)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.