दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळंच निगेटिव्ह, रायगडावरील रोषणाईवरुन श्रीकांत शिंदे-संभाजीराजे आमनेसामने

दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल" असा टोलाही श्रीकांत शिंदेंनी लगावला. (Shrikant Shinde Sambhajiraje Chhatrapati)

  • मेहबूब जमादार, टीव्ही 9 मराठी, रायगड
  • Published On - 9:23 AM, 20 Feb 2021
दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळंच निगेटिव्ह, रायगडावरील रोषणाईवरुन श्रीकांत शिंदे-संभाजीराजे आमनेसामने
रायगडावरील रोषणाईबाबत श्रीकांत शिंदे आणि संभाजीराजे छत्रपती आमनेसामने

रायगड : दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल, असं म्हणत शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांनी भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना टोला लगावला. रायगडावरील रोषणाईबाबत शिवसेना खासदार आणि भाजप खासदार आमनेसामने आले आहेत. (Shivsena MP Dr Shrikant Shinde answers Sambhajiraje Chhatrapati criticism on Raigad Lighting)

खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर काल सध्यांकाळी उशिरा भेट दिली. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फंडातून करण्यात आलेल्या रोषणाईची पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शनही घेतले. पत्रकारांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांना छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडावरील रोषणाईबद्दल केलेल्या टीकेविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा श्रीकांत शिंदेंनी कोणाचेही नाव न घेता रोषणाईवरील टीकेबद्दल खेद व्यक्त केला.

“विद्युत रोषणाई प्रमाणिक हेतूने”

“राजसदर काळोखात होती, महाराज काळोखात होते. मी विद्युत रोषणाई एका प्रमाणिक हेतूने करायला सांगितली होती. रोषणाईही वेगळ्या प्रकारची असू शकते, राजकीय-राष्ट्रीय रोषणाईपण असू शकते, हे मला आज कळलं. दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल” असा टोलाही श्रीकांत शिंदेंनी लगावला. यावेळी महाडचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले आणि अन्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संभाजीराजे छत्रपतींचीही नाराजी

दरम्यान, या लायटिंगवरुन छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वात आधी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. “भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल”, असा हल्लाबोल संभाजीराजेंनी ट्विटरवरुन केला होता.

“त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो” असे टीकास्त्रही संभाजीराजेंनी सोडले होते.

अजित पवार काय म्हणाले?  

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात. यात काहीवेळा अजाणतेपणी म्हणा किंवा फार उत्साहामध्ये म्हणा अशा गोष्टी होतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातलं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डीजे लाईट लावणं ही बाब अतिशय गंभीर आहे. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाला यापुढे काळजी घ्यावी लागेल”, असं अजित पवार म्हणाले.

VIDEO – रायगडावरील लायटिंगबाबत अजित पवार काय म्हणाले?

अमोल कोल्हे काय म्हणाले?

रायगडावरील लायटिंगबाबत जे घडलं त्याबाबत मला जास्त माहिती नाही. माध्यमातून वाचनात आलं आहे. पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. याबाबत संभाजीराजे छत्रपती अधिक बोलू शकतील, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

शिवजयंतीवर निर्बंध आहेत, मात्र शिवभक्त म्हणून माझी सुद्धा भावना आहे की हे जे निर्बंध घातलेत त्यामुळे माझाही हिरमोड झाला. आपण दोन पावले मागे आलो, पण पुढच्या वर्षी जोरात शिवजयंती साजरी करू. ही शिवजयंती साधेपणाची नाही, कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं. (Shivsena MP Dr Shrikant Shinde answers Sambhajiraje Chhatrapati criticism on Raigad Lighting)

खासदार श्रीकांत शिंदेंचं चुकलं काय?  

स्वत:च्या खर्चाने रायगडावर शिवजयंतीपूर्वी आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ही लायटिंग करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना अल्पोपहाराचेही शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. विशेष शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी दोन लाखाची आर्थिक मदत दिली. तसेच श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे पालकत्वदेखील स्वीकारले आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चार दिवसापूर्वी रायगडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांकडे लक्ष्य देऊन त्यांच्यावर उपाय सूचवले. निसर्ग वादळानंतर रायगड किल्यावरील विद्युत रोषणाई कोलमडली होती. त्यानंतर पुरातत्व खात्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. ही बाब शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर शिंदे यांनी येथील विद्युत रोषणाईचे साहित्य स्वतः देण्याची घोषणा केली. तसेच, 19 फेब्रुवारी पूर्वी रायगड उजळला पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले होते.

रायगडावर लायटिंग

संबंधित बातम्या 

खासदार श्रीकांत शिंदेंकडून रायगडावर लायटिंग, अजित पवार म्हणाले, उत्साही लोकांचा अजाणतेपणा! 

शिवजयंती पूर्वी रायगड उजळणार, श्रीकांत शिंदे यांच्या स्वनिधीतून रोषणाई

शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे नाराज! पुरातत्व खात्याला फटकारलं

(Shivsena MP Dr Shrikant Shinde answers Sambhajiraje Chhatrapati criticism on Raigad Lighting)