Sandipan Bhumre | नेते चले गुवाहटी, इधर किस्मत पलटी!! पैठणच्या संदिपान भूमरेंना म्हाडाची लॉटरी, औरंगाबादेत तुफ्फान चर्चा

म्हाडाचं खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही शिवसेनेच्या संदिपान भुमरे यांना हे घर लागलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून आमची कामं होत नाहीत, अशी ओरड आमदार कसे करतायत? असा प्रश्नही नेटिझन्सकडून विचारला जातोय.

Sandipan Bhumre | नेते चले गुवाहटी, इधर किस्मत पलटी!! पैठणच्या संदिपान भूमरेंना म्हाडाची लॉटरी, औरंगाबादेत तुफ्फान चर्चा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 7:35 PM

औरंगाबादः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीत मराठवाड्यातील शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबादमधून पाच आमदार सोबत गेले. यात पैठणचे आमदार तसेच रोजगार व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आमदार महाशय सध्या तिकडे गुवाहटीत आहेत तर  इकडे त्यांना चक्क लॉटरी लागली आहे. संदिपान भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाची लॉटरी लागली आहे. औरंगाबादमधील म्हाडाच्या (MHADA) चिकलठाणा येथील घरासाठी शुक्रवारी ऑनलाइन सोडत जाहीर झाली. या लॉटरीत मंत्री संदिपान भुमरे यांना आमदार कोट्यातून चक्क म्हाडाचे घर लागले आहे. विधान परिषद निवडणुकांनंतर आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहटीत आलिशान हॉटेलमध्ये राहाणाऱ्या आमदारांकडे एवढा पैसा आला कुठून, यांना नक्की कोण रसद पुरवतंय, यावरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. त्यातच आमदारांनी आमदारांच्या कोट्यातून स्वतःलाच घर घेतल्यामुळे संदिपान भुमरे तुफ्फान ट्रोल केले जात आहेत.

औरंगाबादेतून पाच आमदार गुवाहटीत

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची जंगी सभा येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ग्राउंडवर झाली. या सभेत सर्वच शिवसेना आमदार आणि खासदारांची मोठ-मोठी भाषणं झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर सर्वांनी स्तुतीसुमनं उधळली. मात्र चार दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडानंतर जिल्ह्यातील पाच आमदार अचानक नॉट रिचेबल झाले. काही वेळानंतर ते एकनाथ शिंदेंसोबत आधी सूरत आणि नंतर गुवाहटीत असल्याचं कळलं. औरंगाबदमधून पैठणचे संदिपान भूमरे, वैजापूरचे रमेश बोरनारे, सिल्लोडचे अब्दुल सत्तार, औरंगाबादचे संजय शिरसाठ आणि प्रदीप जैस्वाल हे आमदार एकनाथ शिंदेंसोबत सध्या गुवाहटीत आहेत.

1200 सदनिकांसाठी सोडत

म्हाडाची मराठवाड्यातील 1200 सदनिकांसाठी शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने सोडत घेण्यात आली. या सोडतीसाठी आठही जिल्ह्यांतून जवळपास 11 हजारपेक्षा जास्त अर्ज आले होते. म्हाडासाठी विविध गटांसाठी काही सदनिका राखीव ठेवल्या जातात. यातूनच राज्यातील लोक प्रतिनिधींसाठी दोन टक्के कोटा राखीव ठेवला जातो. या राखीव कोट्यातून भूमरे यांना घर मिळाले आहे.

म्हणे राष्ट्रवादी कामं करत नाहीत…

संदिपान भूमरे यांना म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळाल्यामुळे औरंगाबादच्या सामान्य नागरिकांकडून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. म्हाडाचं खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही शिवसेनेच्या संदिपान भुमरे यांना हे घर लागलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून आमची कामं होत नाहीत, अशी ओरड आमदार कसे करतायत? असा प्रश्नही नेटिझन्सकडून विचारला जातोय. तर एका सामान्य नागरिकाला घर मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.. अशा पोस्ट टाकून आमदारांवर उपहासात्मक टिकाही अनेकांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.