Tejas Thackeray : तेजस उद्धव ठाकरेंची राजकीय इनिंग सुरु? आता मिलिंद नार्वेकर म्हणतात, एक घाव, दोन तुकडे!

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आधी सामना दैनिकात हटके शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरुनही तेजस ठाकरे यांना भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत.

Tejas Thackeray : तेजस उद्धव ठाकरेंची राजकीय इनिंग सुरु? आता मिलिंद नार्वेकर म्हणतात, एक घाव, दोन तुकडे!
Tejas Thackeray
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 3:26 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचं राजकारणात लाँचिंग होत आहे की काय याची चर्चा आता सुरु झाली आहे. कारण तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (Tejas Thackeray Birthday) शिवसेनेतून लक्षवेधी पोस्ट सोशल मीडियावर करण्यात येत आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आधी सामना दैनिकात हटके शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरुनही तेजस ठाकरे यांना भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. “एक घाव , दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे” यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे.

मिलिंद नार्वेकर यांचं ट्विट 

‘सामना’तून शुभेच्छा  

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तुलना का? 

या जाहिरातीत तेजस ठाकरे यांच्यासोबत व्हिव्हियन रिचर्डस् यांचाही फोटो देण्यात आला आहे. हे दोन्ही फोटो पाहिल्यानंतर तेजस आणि रिचर्डस् यांच्यातील आक्रमकपणातील साम्य दाखवण्याचा प्रयत्न आहे. मिलिंद नार्वेकर हे मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. त्यांनी क्रिकेटचा धागा पकडून रिचर्ड्स  यांच्याशी तुलना केली. रिचर्डस हे जसे स्फोटक, आक्रमक होते, तसेच तेजस ठाकरे एक घाव, दोन तुकडे करणारे आहेत, असं दर्शवण्याचा हा प्रयत्न आहे.

तेजस ठाकरे राजकारणात उतरणार?

पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचं आणि वरुण सरदेसाई यांच्यावर युवा सेनेचा भार देण्याची चर्चा  शिवसेनेत सुरु असल्याची चर्चा आहे. तर तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवसेना नव्या दमाच्या नेतृत्वाला सोबत घेऊन महापालिका सर करण्यासाठी डावपेच आखत असल्याचं स्पष्ट होत आहे.

संबंधित बातम्या  

आदित्य ठाकरेंकडे पालिकेची जबाबदारी, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार, तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार?; वाचा शिवसेनेत चाललंय काय?

तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं केलं कौतुक

Happy Birthday Rashmi Thackeray | ‘मातोश्री’च्या सूनबाई ते मिसेस मुख्यमंत्री, रश्मी ठाकरेंचा प्रवास

Tejas Thackeray | ‘बोईगा ठाकरे’नंतर तेजस ठाकरेंनी पालीची दुर्मिळ प्रजाती शोधली