आदित्य ठाकरेंकडे पालिकेची जबाबदारी, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार, तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार?; वाचा शिवसेनेत चाललंय काय?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, मनसे, भाजप आणि राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही कंबर कसली आहे. (Tejas Thackeray to venture into Politics, says mayor kishori pednekar)

आदित्य ठाकरेंकडे पालिकेची जबाबदारी, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार, तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार?; वाचा शिवसेनेत चाललंय काय?
aaditya thackeray
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 1:16 PM

मुंबई: पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचं आणि वरुण सरदेसाई यांच्यावर युवा सेनेचा भार देण्याचं शिवसेनेत घटत आहे. तर तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. त्यामुळे शिवसेना नव्या दमाच्या नेतृत्वाला सोबत घेऊन महापालिका सर करण्यासाठी डावपेच आखत असल्याचं स्पष्ट होत आहे. (Tejas Thackeray to venture into Politics, says mayor kishori pednekar)

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, मनसे, भाजप आणि राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेनेने युवा नेत्यांना पुढे आणण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

महापौर काय म्हणाल्या?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मीडियाशी संवाद साधला. आम्हालाही निवडणुकीची तयारी करावीच लागते. इलेक्शन आम्ही कधीही इझीली घेत नाही. इलेक्शन हे नेहमी संग्राम आहे. युद्ध आहे. त्यामुळे आमची तयारी असणारच. त्याबाबत कुणाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. कोणतीही निवडणूक आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढत असतो. आदित्य ठाकरेही सोबत आहेतच. डबल हॉर्स पॉवर आहे, असं पेडणेकर म्हणाले.

तेजस ठाकरे हे नावाप्रमाणे तेजस आहेत. ते जे काही संशोधन करतात त्याला हॅट्स ऑफ आहे. ते राजकारणात येणार का? ते म्हणण्यापेक्षा ते ऑर्डरी आहेत. ते जर राजकारणात येत असतील तर त्यांना काय पद द्यायचं वगैरे ते उद्धव ठाकरेच ठरवतील. उद्धव ठाकरे जे काही निर्णय घेतात तो नागरिकांच्या हिताचाच असतो. आदित्य ठाकरे हे वयाच्या सोळाव्या वर्षी राजकारणात आले. त्यांनीही स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे घराण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्वही दिसून येत आहे, असं ते म्हणाले. तेजस ठाकरे हे आक्रमक फलंदाज आहेत. ते करत असलेल्या कामामध्ये त्यांची आक्रमकता दिसते, असंही त्या म्हणाल्या.

म्हणून सरदेसाईंकडे जबाबदारी जाणार

दरम्यान, वरुण सरदेसाई गेल्या काही दिवसांपासून युवा सेनेत प्रचंड सक्रिय झाले आहेत. त्यांनी युवा सेनेची बांधणी करण्यासाठी दौरे सुरू केले आहेत. ते दोन दिवसांपूर्वी जळगावच्या दौऱ्यावर होते. सातत्याने त्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरू आहेत. नाशिकमध्ये देखील वरुण सरदेसाई हे आज युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी महापालिका निवडणुकां संदर्भात रणनीती तयार करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडे मंत्री पद आहे. शिवाय मुंबई महापालिकेची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे वरुण सरदसाई यांच्याकडे शिवसेनेच्या राज्याच्या युवा सेनेची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. (Tejas Thackeray to venture into Politics, says mayor kishori pednekar)

संबंधित बातम्या:

संजय राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?; प्रविण दरेकर यांचा सवाल

मोठी बातमी! भंडारा जिल्हा कोरोना मुक्त; शेवटच्या रुग्णालाही मिळाला डिस्चार्ज

“नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात”

(Tejas Thackeray to venture into Politics, says mayor kishori pednekar)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.