डिलिमिटेशन बिल म्हणजे प्रचंड मोठं संकट; अरविंद सावंतांनी उदाहरण देऊन सांगितलं, भाजपावर खळबळजनक आरोप

डिलिमिटेशन बिल उद्या संसदेत मांडले जाणार आहे. त्यापूर्वी अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आता उदाहरण देत मोठे विधान केले आहे.

डिलिमिटेशन बिल म्हणजे प्रचंड मोठं संकट; अरविंद सावंतांनी उदाहरण देऊन सांगितलं, भाजपावर खळबळजनक आरोप
Arwind Sawant
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 29, 2026 | 11:38 AM

सध्या देशात डिलिमिटेशन बिलावरून वादविवाद सुरु आहेत. सत्ताधारी NDA हे विधेक मंजरून करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे लोकशाही संकटात येऊन हे विधेयक कसे मंजूर होणार नाही यावर भर देत आहेत. आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘प्रत्येक मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाला फेवरेबल होईल. अनुकूल होईल. निवडून येता येईल. अशा पद्धतीने त्याची रचना करा. हा खरा त्याच्यातला त्यांचा डाव आहे’ असे म्हणत टीका केली आहे.

टीव्ही 9 मराठीशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, “मागच्या वेळी देखील त्यांनी हाच प्रयत्न केला होता. महिला आरक्षणाच्या कायद्याच्या आड येऊन. महिला आरक्षणाचा कायदा 2023ला पास झालेला आहे. आता सुद्धा त्यांचा हाच प्रयत्न आहे. हे डिलिमिटेशन काय आहे? परिसिमन किंवा सीमांकन असे शब्द आहेत ते. म्हणजे आपल्या मतदार क्षेत्राचा नकाशा बदलणे. आकार बदलणे. आता हा जो काही विषय आहे तो पाहिल्यानंतर आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? असं जेव्हा आपण म्हणतो ज्यांची वृत्तीच नी… म्हणजे कपटीपणाची आहे ती पोऱ्यात कशी सुधारेल. ज्यांनी इलेक्शन कमिशनरच ज्या पद्धतीने निवडला त्यासाठी कायद्यात केलेला भयानक बदल आणि त्याला दिलेले अधिकार त्यावर त्याच्यात कोणत्याही कोर्टात न जाणे इथेही नेमकं तेच आहे. परिसिमन करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही. म्हणजे काय.. पुन्हा मनमानी.. तुमच्यासमोर दोन आताची ज्वलंत उदाहरणे आहेत. एक आहे जम्मू कश्मीरचं दुसरं आहे आसामचं. तेथे त्यांनी हा प्रयोग केला. तो प्रयोग तुम्ही पाहा मग तुम्हाला लक्षात येईल.”

Loading...

पुढे ते म्हणाले की, “जन्मू मधील एक विशिष्ठ समाजाच्या माणसांचा नागरिकांचा सबंध भाग त्या कश्मीरच्या व्हॅलितील मतदार संघात टाकला. आता तिथला खासदार आणि जम्मूमधली माणसं यांचा संपर्क होणार कधी? डोंगराळ भाग क्रॉस करुन मग व्हॅली येते आपली. ते कुठे आणि हे कुठे.. याच्यावर तुम्ही आंदाज बांधा ना की ठरवून करणार. ही माणसे भाजपच्या फेवरमध्ये नाहीत, यांना कापा. मतदार संघाची रचना अशी करा की प्रत्येक मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाला फेवरेबल होईल. अनुकूल होईल. निवडून येता येईल. अशा पद्धतीने त्याची रचना करा. हा खरा त्याच्यातला त्यांचा डाव आहे. पण त्यांचा हा डाव देशाच्या लोकशाहीच्या मुळावर येणारा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याला विरोध केला पाहिजे.”

लोकसभा सचिवालयाकडून एक पत्र आलं आहे. त्यांची आसन व्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यामागच्या कारणाविषयी बोलताना ते म्हणाले की, कारण काहीच नाही. म्हणजे मनमानी जी आहे… त्यांच्याच नेत्यांचं सांगतो माननीय अटल बिहारी वाजपेय म्हणायचे छोटे मनसे आदमी बडा नही होता. माझी बसण्याची व्यवस्था 433 क्रमांक आहे. काल अचानक मला पत्र आलं मला अशा अशा प्रकारचे निर्देश आलेले आहेत की आपली आसन व्यवस्था 433हून 500 क्रमांकावर करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us