सिंधुदुर्गात 'ठाकरे सरकार'वर नाराजी, स्थानिक निवडणुकीत फटका बसणार?

सिंधुदुर्गातील आमदारांना मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे जिल्ह्यात ठाकरे सरकारवर नाराजीचा सुर उमटत असल्याचे (Shivsena activist unhappy on thackeray government sindhudurg) बोललं जात आहे.

Shivsena activist unhappy on thackeray government sindhudurg, सिंधुदुर्गात ‘ठाकरे सरकार’वर नाराजी, स्थानिक निवडणुकीत फटका बसणार?

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील आमदारांना मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे जिल्ह्यात ठाकरे सरकारवर नाराजीचा सुर उमटत असल्याचे (Shivsena activist unhappy on thackeray government sindhudurg) बोललं जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य असूनही मंत्रिमंडळातील पाटी मात्र कोरी राहिली आहे. तब्ब्ल 25 वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. खरं तर जिल्ह्याला हक्काचे पालकमंत्री मिळणार अशी आशा असताना दीपक केसरकर यांचा पत्ता कापला गेला. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकात याचा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यताही (Shivsena activist unhappy on thackeray government sindhudurg) वर्तवली जात आहे.

कोकण आणि शिवसेना हे समीकरण गेल्या कित्येक वर्षात पाहायला मिळत आहे. खरं तर कोकणाने शिवसेनेला कायमच राजकीय दृष्ट्या भरभरुन दिल आहे. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाही शिवसेना आणि कोकण यांचं नातं मात्र अतूट राहीलं. जेव्हा राज्यात पहिली शिवसेना भाजपची सत्ता आली तेव्हा खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी मालवणात येऊन कोकणवासियां समोर नतमस्तक झाले होते. कोकण आणि शिवसेना हे असं अतूट नातं असताना यावेळच्या मंत्रिमडळात मात्र सिंधुदुर्गच्या मंत्रिपदाची पाटी कोरी राहिली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य नागरिक शिवसेनेवर कमालीचा नाराज झाला आहे.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधीक आमदार कोकणातून निवडून आले आहेत. अस असताना फक्त उदय सामंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मात्र 25 वर्षानंतर पहील्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. यामुळे विरोधकांना तर आयत कोलीत मिळालं आहे.

विरोधकांनी तर थेट येथील आमदारांवर पक्ष नेत्रृत्वाचा विश्वास नसेल, गेल्या पाच वर्षांत त्यांनी कोणतीही काम केली नाहीत म्हणून त्यांना मंत्रिपद दिल नसेल असा टोला लगावला आहे.

दरम्यान, कोकणाचा विचार करता आता नारायण राणे हे भाजपमध्ये बऱ्यापैकी स्थिरावले आहेत. नुकत्याच झालेल्या काही पोटनिवडणुकीत त्यांनी चांगलं यश मिळवून दिलं आहे. नारायण राणे यांचं कोकणातील पुनरागमन शिवसेनेला मात्र नक्कीच अडचणीत आणणार ठरु शकतं. नारायण राणे याना अंगावर घेणाऱ्या शिवसेनेनेनं सिंधुदुर्ग जिल्हा कोरा सोडून नारायण राणे यांच्या कोकणातील वाडीला अप्रत्यक्ष पांठीबाच दिला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *