मुंबईनंतर औरंगाबादेतही भाजप-शिवसेनेचं मानापमान नाट्य

औरंगाबाद : मुंबईतील मेट्रोच्या प्रकल्पांच्या भूमीपूजनात शिवसेना-भाजपात मानापमानाचं नाटक रंगलं. नाटकाचा पुढचा भाग आता औरंगाबादेत रंगणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. औरंगाबादेत येत्या 23 तारखेला 100 कोटींच्या रस्त्याचं भूमीपूजन आणि शहर बससेवेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम महापालिकेने आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलंय. मात्र भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुणालाही आमंत्रित करण्यात आलं नाही. …

, मुंबईनंतर औरंगाबादेतही भाजप-शिवसेनेचं मानापमान नाट्य

औरंगाबाद : मुंबईतील मेट्रोच्या प्रकल्पांच्या भूमीपूजनात शिवसेना-भाजपात मानापमानाचं नाटक रंगलं. नाटकाचा पुढचा भाग आता औरंगाबादेत रंगणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. औरंगाबादेत येत्या 23 तारखेला 100 कोटींच्या रस्त्याचं भूमीपूजन आणि शहर बससेवेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम महापालिकेने आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलंय. मात्र भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुणालाही आमंत्रित करण्यात आलं नाही. त्यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने पैसा दिला म्हणून हे शक्य झालं तरी शिवसेना यशाचं श्रेय एकटंच घेण्यासाठी भाजपला डावलत असल्याचा आरोप भाजपने केलाय.

अखेर सारवासारव करण्यासाठी आज शिवसेनेच्या महापौरांसह काही नेते मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र इतक्या उशिराने आमंत्रण दिल्याने मुख्यमंत्री येणार का असा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतात. त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी हे उशिराचं आमंत्रण देण्याचा घाट शिवसेनेने घातल्याचा आरोप होतोय. विकासकामांच्या उद्घाटनावरून आता शिवसेना-भाजपात चांगलंच मानापमानाचं नाटक रंगणार असं चित्र आहे.

मुंबईत नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याणमध्ये मेट्रोच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला. तर कोस्टल रोडचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठीही मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

भाजप आणि शिवसेना राज्यात जसे सत्तेत एकत्र आहेत. तसेच शिवसेना आणि भाजप औरंगाबाद महापालिकेतही एकत्र आहेत. योजनांसाठी पैसा सरकारकडून मिळणार आहे. पण श्रेय घेण्याची लढाई ही वादाचं कारण बनली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *