VIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली

"अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो", अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली. यातून त्यांनी बावनकुळे यांची थेट लायकीच काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

  • Updated On - 11:58 pm, Sat, 24 July 21 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
VIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली


जळगाव : राज्याच्या राजकारणात काही नेते विरोधी नेत्यांवर हल्ला करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या धारधार आणि थेट वक्तव्यांनी ते विरोधकांना अक्षरशः नामोहरम करतात. अशाच प्रकारे विरोधकांवर हल्लाबोल करणारे नेते म्हणजे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील. त्यांनी यावेळी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय. “अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो”, अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली. यातून त्यांनी बावनकुळे यांची थेट लायकीच काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपमध्ये लायकी नाही त्यांना तिकीट मिळत नाही. अरे बाबा तुला तिकीट दिलं नाही, तू काय बढाई मारतो. एकनाथ खडसे यांना तिकीट मिळालं नाही, पण खडसेंच्या मुलींला तिकीट दिलं. ओबीसी नेत्यांना संपवण्याचे काम भाजपमध्ये होत आहे. आधी आपली दुकानं पक्की करा, मगचं गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करा.”

चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगाव दौर्‍यावर असताना गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर गुलाबराव पाटील आज (24 जुलै) शिवसेनेच्या शिव संपर्क अभियान दरम्यान पत्रकारांशी बोलत होते.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

महापालिकेत सत्ता आली, पण शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये धुसफूस, जळगावच्या राजकारणात नेमकं चाललंय काय?

शिवसेनेतील ‘हा’ आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, शिवसेनेच्या आमदाराचा मंत्र्यावर गंभीर आरोप

Shivsena Gulabrao Patil criticize Chandrashekhar Bavankule over election ticket in Jalgaon

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI