उद्धव ठाकरेंसोबत सावलीसारखे असणारे मिलिंद नार्वेकर शिंदेंकडे? या चर्चेवर शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 01, 2022 | 2:51 PM

धुळ्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी चरणसिंह थापा यांच्यानंतर मिलिंद नार्वेकर हेदेखील शिंदे गटात येतायत, असं ऐकतोय... असं वक्तव्य केलं. त्यानंतर नार्वेकरांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

उद्धव ठाकरेंसोबत सावलीसारखे असणारे मिलिंद नार्वेकर शिंदेंकडे? या चर्चेवर शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया
किशोरी पेडणेकर, मुंबईच्या माजी महापौर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) सावलीसारखे असणारे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावर शिवसेनेच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी ही प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाकडून अनेक मार्गांनी शिवसेनेच्या नेत्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतोय. पण मिलिंद नार्वेकरांची सद्बुद्धी असं होऊ देणार नाही, असा  विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलाय. टीव्ही9 शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

धुळ्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी चरणसिंह थापा यांच्यानंतर मिलिंद नार्वेकर हेदेखील शिंदे गटात येतायत, असं ऐकतोय… असं वक्तव्य केलं. त्यानंतर नार्वेकरांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ ते वेगवेगळ्या मार्गाने ट्रॅप करतायत हे नक्की. पण मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील, असं कुणालाही वाटत नाही.

ज्या वेळेला नारायण राणे आणि राज ठाकरेंनी त्यांच्यावर प्रचंड आरोप केले. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले.

आज ते आध्यात्मिक क्षेत्रात, तिरुपती संस्थानात आहेत. त्यांची सद्बुद्धी चांगली आहे. त्यामुळे मला खात्री आहे, ते असं काही करतील, अशी शक्यता नाही…,असं वक्तव्य पेडणेकर यांनी केलं.

हे तेच मिलिंद नार्वेकर आहेत, जे उद्धव ठाकरेंचे अनेक वर्षांपासूनचे स्वीय सहायक आहेत. उद्धव यांच्यासोबत ते सावलीसारखं असायचे. पण काही दिवसांपूर्वी रवी म्हात्रे यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी स्वीय सहाय्यक पदी केली आहे.

तसेच गणेशोत्सवात एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. या घटनाक्रमामुळे मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

उद्धव ठाकरेंच्या गटातून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया आली आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही वेळापूर्वी यावर भाष्य केलं. आज माझा मूड वेगळा आहे. मी काहीही लपवून ठेवत नाही. मिलिंद नार्वेकर आमच्याकडे येणार की नाही, माहिती नाही… असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं…

मुख्यमंत्र्यांचीही प्रतिक्रिया पहा