पुणे : शिवसेना नेते संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान राऊत यांनी भोसरी आणि वडगाव शेरी येथे भाषण झाले. या दोन्ही भाषणात संजय राऊत यांचे अजित पवार यांच्याबाबत बोललेले दोन वेगळे सूर पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडला जाऊन राष्ट्रवादीला डिवचण्याचं काम केलं. पुणे जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र सायंकाळी वडगाव शेरी येथील भाषणात संजय राऊत बाजू सावरताना दिसले. (Shivsena leader sanjay raut statement on uddhav thackarey and amit shah meet)