‘तुम्ही विनायक राऊतांच्या अंगावर या, आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणू’, शिवसेनेचं निलेश राणेंना आव्हान

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदूर्गातील दौऱ्यानंतर आता शिवसेना आणि राणे कुटुंबात चांगलीच जुंपली आहे (ShivSena leader Sudhir More challenge to Nilesh Rane).

तुम्ही विनायक राऊतांच्या अंगावर या, आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणू, शिवसेनेचं निलेश राणेंना आव्हान
| Updated on: Feb 11, 2021 | 4:03 PM

सिंधुदुर्ग : “माजी खासदार निलेश राणे यांनी बेहोशीमध्ये खासदार विनायक राऊंतबाबत वक्तव्य करतात. आम्ही वाट पहातोय, तुम्ही विनायक राऊतांच्या अंगावर या. आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणू”, असा घणाघात शिवसेनेचे रत्नागिरीचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदूर्गातील दौऱ्यानंतर आता शिवसेना आणि राणे कुटुंबात चांगलीच जुंपली आहे (ShivSena leader Sudhir More challenge to Nilesh Rane).

भाजप खासदार नारायण राणे यांना मंत्रीपदावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी डिवचले होते. “नॉन मॅट्रीक नारायण राणेंना मंत्रीपद हा महाराष्ट्राचा अवमान असेल”, असे चिमटे त्यांनी काढले होते. या टीकेवरुन नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणेंनी ट्टिटरवरून विनायक राऊत यांना इशारा दिला होता (ShivSena leader Sudhir More challenge to Nilesh Rane).

निलेश राणेंनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्यांनी “आमच्यावर टिका करताना जी भाषा वापरली जात आहे ती जर बदलली नाही तर दिसाल तिथं फटके घालीन”, असा इशारा विनायक राऊत यांना दिला होता. त्यानंतर याच मुद्यावरून कोकणात राजकीय ठिणगी पडलीय.

रत्नागिरीत शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे आणि शिवसेना लोकसभा कोकण समन्वयक प्रदिप बोरकरांनी पत्रकार परिषद घेतली. “हिंमत असेल तर रत्यावर येवून आमच्याशी दोन हात करावेत, असा इशारा माजी खासदार निलेश राणेंनी दिलाय. शिवसैनिकांकडे संयम आहे तोपर्यंत शिवसैनिक शांत रहातील. संयम सुटला तर शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील”, असा घणाघात प्रदिप बोरकर यांनी केला. तर “निलेश राणे बेहोशीमध्ये असं वक्तव्य करतात. आम्ही वाट पहातोय, तुम्ही विनायक राऊतांच्या अंगावर या. आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणू”, असं थेट आव्हानच सुधिर मोरे यांनी निलेश राणेंना दिलाय. त्यामुळे सध्या राणे विरुद्ध शिवसेना असाच कलगीतुरा कोकणातल्या राजकारणाच्या आखाड्यात रंगलाय.

हेही वाचा :

शाह विश्वासघातकी, फडणवीसांच्या हट्टामुळे युती तुटल्याचं भाजपच्या दिल्लीश्वरांनाही मान्य : विनायक राऊत