AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : “एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना संपवण्यासाठी भाजपचा डाव”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट आरोप

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना संपवण्यासाठी भाजपचा डाव असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट आरोप केलाय.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना संपवण्यासाठी भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट आरोप
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 25, 2022 | 3:58 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे यांचं बंड हा सध्या राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेतला विषय आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पाठिंबा असल्याचं उघडपणे बोललं जातंय. त्याला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना (Shivsena) संपवण्यासाठी भाजपचा डाव असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट आरोप केलाय. ते शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.

ठाकरेंचा भाजपवर आरोप

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचं उघडपणे बोललं जातंय. त्याला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना संपवण्यासाठी भाजपचा डाव असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट आरोप केलाय.

“बाळासाहेबांचं नाव वापराल तर याद राखा”

बाळासाहेब ठाकरे नाव वापरणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खडसावलं. “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरेंकडेच असणार हे आता स्पष्ट झालं आहे. “मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा आजतादायत केली नाही. इथून पुढेही करणार नाही. हिंमत असेल तर स्वताच्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

शिवसेना कार्यकारिणी बैठक

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पक्षाकडून त्यांचं नेतेपद काढलं जातं का, याबाबत चर्चा होती. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण 6 प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा, या मागणीमुळे शिंदेंची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी पक्ष उभा असेल, असाही प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल