Uddhav Thackeray : स्वत:च्या बापाच्या नावानं मत मागा, ठाकरे भडकले, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 6 ठराव मंजूर, बंडखोरांवर कारवाईचे सर्व अधिकार ठाकरेंकडे

Uddhav Thackeray : कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मत मागा. आधी नाथ होते आता बाप झाले, अशी टीका देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलाय.

Uddhav Thackeray : स्वत:च्या बापाच्या नावानं मत मागा, ठाकरे भडकले, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 6 ठराव मंजूर, बंडखोरांवर कारवाईचे सर्व अधिकार ठाकरेंकडे
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 3:58 PM

मुंबई : एकनाथ शिंदे बंडानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली. यावेळी या कार्यकारिणीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पक्षाकडून त्यांचं नेतेपद काढलं जातं का, याबाबत चर्चा होती. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण 6 प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. यावेळी स्वत:च्या बापाच्या नावानं मत मागा, असं म्हणत बंडखोरांना उद्देशून ठाकरे भडकल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा, या मागणीमुळे शिंदेंची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी पक्ष उभा असेल, असाही प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केलं. चांगलं काम केल्यानं अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दरम्यान, बंडखोरांवर कारवाईचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्याचा महत्वाचा प्रस्तावही मांडण्यात आलाय. शिवसेनेच्या कार्यकारिणीतील महत्वाचे प्रस्ताव पाहूया…

कार्यकारणीतील प्रस्ताव

  1. शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि राहिल
  2. एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा
  3. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे
  4. मराठी अस्मितेशी कधीच प्रतारणा करणार नाही
  5. हे सुद्धा वाचा
  6. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केला. यासाठी उद्धव ठाकरेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
  7. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार

महत्वाचे प्रस्ताव जाणून घ्या…

शिवसेनेच्या कार्यकारिणीत कोणते ठराव आणि मुद्दे मांडण्यात आले ते आहेत. त्यापैकी बेईमानांवर कारवाई करणे, शिवसेना आणि महापालिकेसंदर्भात काही प्रस्ताव आहेत. यातील महत्वाचे प्रस्ताव पाहूया….

बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बेईमानी करण्याऱ्यांवर कारवाईचे सर्व अधिकार असणार आहेत. बेईमानी करणाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुख थेट कारवाई करू शकतात. बंडखोरांवर कारवाईचे थेट आणि सर्व अधिकार ठाकरेंकडे असणार आहे

शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि राहिल

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा वेगळा गट,  या युद्धात शिवसेनेच्या कार्यकारिणीत मोठा निर्णय घेण्यात आला. तसाही प्रस्तावही मांडण्यात आला. शिवसेना ही बाळासाहेबांचीच असणार आणि राहणार, असा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आलाय.

पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार

शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. यावेळी महापलिकेसाठी तयार रहा, असंही सांगण्यात आलंय.

‘आधी नाथ होते आता दास झाले’

कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मत मागा. आधी नाथ होते आता बाप झाले, अशी टीका देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलाय.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.