अखेर आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ ठरला

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Sep 24, 2019 | 6:02 PM

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढणारे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढतील. विशेष म्हणजे लोकांमधून निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरतील.

अखेर आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ ठरला

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Worli Vidhansabha) हे विधानसभा निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. इतकंच नाही तर त्यांचा मतदारसंघही ठरला आहे. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा (Aditya Thackeray Worli Vidhansabha) मतदारसंघातून लढणार आहेत. टीव्ही 9 मराठीला खात्रीलायक सूत्रांनी ही एक्स्क्लुझिव्ह माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढणारे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढतील. विशेष म्हणजे लोकांमधून निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरतील.

पेपर फोडण्याचं सचिन अहिर यांचं आवाहन

वरळी विधानसभा मतदारसंघात (Worli Constituency) आदित्य ठाकरे हेच उमेदवार असतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर यांनी कार्यकर्ता मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांना आता तरी वरळी विधानसभेचा पेपर फोडा असं आवाहन केलं. मात्र “युतीचे चित्र स्पष्ट न झाल्याने सध्या पेपर तपासणी सुरु आहे. नंतरच खरे पेपर फुटतील”, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं.

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि वरळी विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार असणार अशी चर्चा सुरु झाली. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचा सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने पत्ता कट होणार का, असे प्रश्नही उपस्थित केले गेले. मात्र वरळीत सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन केले.

युवा सेनेची पोस्टरबाजी

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा शिवसेना आमदार अनिल परब यांनी बोलून दाखवल्यानंतर युवासेनेला स्फुरण चढलं होतं. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात आली.

संपूर्ण वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. ‘हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य हे पहिलेच सदस्य असतील.

संबंधित बातम्या :

आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?

वरळीतून विधानसभा लढवून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार, अनिल परब यांनी ‘ठरवलंय’

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI