संजय राऊतांच्या आयुर्वेदिक कोंबडी आणि शाकाहारी अंड्याने खासदारही गोंधळात

र्चेवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं. त्यांनी आयुर्वेदिक कोंबडी आणि शाकाहारी अंड्याचा उल्लेख करुन सर्वांनाच गोंधळात टाकलं. आयुर्वेद हा प्राचीन परंपरेचा भाग असून या मंत्रालयासाठी जास्तीच्या निधीची मागणी त्यांनी केली.

संजय राऊतांच्या आयुर्वेदिक कोंबडी आणि शाकाहारी अंड्याने खासदारही गोंधळात
सचिन पाटील

| Edited By:

Jul 15, 2019 | 9:32 PM

नवी दिल्ली : राज्यसभेत सोमवारी आयुष मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली, ज्याअंतर्गत आयुर्वेद, होमिओपॅथीला चालना देण्यासाठी विचारमंथन झालं. या चर्चेवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं. त्यांनी आयुर्वेदिक कोंबडी आणि शाकाहारी अंड्याचा उल्लेख करुन सर्वांनाच गोंधळात टाकलं. आयुर्वेद हा प्राचीन परंपरेचा भाग असून या मंत्रालयासाठी जास्तीच्या निधीची मागणी त्यांनी केली. जगभरात योग आणि आयुर्वेदाचा प्रसार आवश्यक आहे आणि यासाठी 1500 कोटींऐवजी किमान 10 हजार कोटींच्या निधीची तरतूद आवश्यक आहे. यातून गरीबांना उपचार मिळतील. आजही आपल्याला चांगले आयुर्वेदिक डॉक्टर पाहायला मिळत नाहीत, असं ते म्हणाले.

आयुर्वेदिक कोंबडीचा किस्सा

आयुर्वेदावर बोलताना संजय राऊतांनी सर्वांच्याच भुवया उंचावणारी माहिती दिली. “मी नंदुरबारमधील एका गावात गेलो होतो तेव्हा जेवणासाठी कोंबडी बनवली होती. पण मी आज कोंबडी खाणार नाही असं सांगितलं. यावर आदिवासी बांधव म्हणाले, ही साधी कोंबडी नाही. ही आदिवासी कोंबडी आहे आणि यामुळे तुमचे सर्व रोग दूर होतात”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

अंडी शाकाहारी

संजय राऊत यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख केला. चौधरी चरण सिंह विद्यापीठातून आलेल्या काही लोकांनी सांगितलं की, आम्ही आयुर्वेदिक अंड्यावर संशोधन करत आहोत. ही अंडी बनवण्यासाठी कोंबडीला फक्त आयुर्वेदिक खाद्य दिलं जातं. यापासून तयार झालेली अंडी पूर्णपणे शाकाहारी असतात आणि मांसाहर न करणाऱ्यांना प्रथिनांची गरज असेल तर तेही खाऊ शकतात, अशी माहिती संशोधकांनी दिल्याचं संजय राऊत म्हणाले.

अंडी शाकाहारी की मांसाहारी हे आयुष मंत्रालयाने लवकरात लवकर स्पष्ट करावं, अशी मागणीही त्यांनी मंत्री श्रीपाद यशो नाईक यांच्याकडे केली. देशात मांसाहार आणि शाकाहार यावर मोठा वाद सुरु आहे. त्यामुळे स्पष्टीकरण देणं संबंधित मंत्रालयाची जबाबदारी आहे. परदेशात टरमरिक कॉफी आली आहे, पण आपण अजून इथेच आहोत, असंही ते म्हणाले.

VIDEO : संजय राऊत यांचं संपूर्ण भाषण


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें