AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सिद्धिविनायक पाप करणाऱ्यांना…’ संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले ‘एकनाथ शिंदे, अजित पवारांनी…’

अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना बाप्पाची प्रतिकृती सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.

'सिद्धिविनायक पाप करणाऱ्यांना...' संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले 'एकनाथ शिंदे, अजित पवारांनी...'
संजय राऊत अजित पवार
| Updated on: Jul 09, 2024 | 1:14 PM
Share

Sanjay Raut Target Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवारांसोबत पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री व पदाधिकारी श्री सिध्दिविनायकाच्या दर्शनासाठी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सिध्दिविनायकाच्या दर्शनाने विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला आहे. अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना बाप्पाची प्रतिकृती सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.

शिवसेना खासदार संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी संजय राऊतांना अजित पवारांच्या सिद्धिविनायक दर्शनाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला.

“सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं”

“जे सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत. ती चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं. पुण्य कोण करतंय आणि पाप कोण करतंय या सर्व गोष्टी समजतात. चोऱ्या लबाड्या कोण करतंय, कोण माझ्या दारात पुण्यात्म व्हायला येतेय, हे देखील सिद्धिविनायकाला कळतं”, असं संजय राऊत म्हणाले.

“कोणालाही आशीर्वाद देत नाही”

“ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलं आहे. सिद्धिविनायक अशाप्रकारे कोणालाही आशीर्वाद देत नाही”, असेही संजय राऊतांनी सांगितले.

यानंतर संजय राऊतांनी वरळीतील हिट अँड रन प्रकरणीही वक्तव्य केले. हिट अँड रन केस मधील मुख्य आरोपी त्याचा मुलगा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत ते ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत. दारुच्या नशेत एका मराठी महिलेला गाडीखाली चिरडून हा मिहीर शहा मुंबई पोलिसांच्या हातून सुटतो कसा, कुठे गेला आहे तो? सुरतला गेला आहे की गुहाटीला लपवला आहे. त्याला याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावा, असेही संजय राऊत म्हणाले.

अजित पवारांसह सर्व आमदारांचे सिद्धिविनायक दर्शन

दरम्यान अजित पवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन प्रतिक्रिया दिली. मंगळवार असल्याने आज आम्ही सर्वांनी दर्शन घ्यायचं, असं ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही येऊन दर्शन घेतलं. आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात देवदर्शन करुन करतो. आम्ही आता जनतेच्या समोर जाणार आहोत, त्यासाठी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावे, सिद्धिविनायकाने आशीर्वाद द्यावे हेच साकडं सिद्धिविनायकाला घातले. आम्ही लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या समोर जाणार आहोत. याची सुरुवात चांगल्या दिवशी केली जाते. तो चांगला दिवस आज नेमका आला आहे, असे अजित पवार म्हणाले.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली