मिलिंद नार्वेकर जगनमोहन रेड्डींच्या भेटीला, ‘या’ कारणासाठी मानले आभार

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आज आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Y S Jaganmohan Reddy) यांची भेट घेतली. यावेळी नार्वेकर यांच्यासोबत त्यांचा परिवार, आणि पक्षाचे सचिव सुरज चव्हाणही होते.

मिलिंद नार्वेकर जगनमोहन रेड्डींच्या भेटीला, या कारणासाठी मानले आभार
मिलिंद नार्वेकर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या भेटीला
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 10:18 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आज आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Y S Jaganmohan Reddy) यांची भेट घेतली. यावेळी नार्वेकर यांच्यासोबत त्यांचा परिवार, आणि पक्षाचे सचिव सुरज चव्हाणही होते. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirumala Tirupati Devasthan Trust) बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल नार्वेकर यांनी जगनमोहन रेड्डी यांचे आभार मानले आहेत. (Milind Narvekar meets Andhra Pradesh CM Jaganmohan Reddy)

शातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या  सदस्यांची यादी 16 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेश सरकारने  जाहीर केली. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

ठाकरेंचा रेड्डींना फोन

त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली होती.

आंध्र प्रदेश सरकारने त्याप्रमाणे 16 सप्टेंबर रोजी अधिकृत अधिसूचना काढत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नवीन सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली. त्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचं वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मिलिंद नार्वेकरांचा अल्पपरिचय

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.

मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर गेली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीए म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

इतर बातम्या :

‘महाविकास आघाडीकडून सत्तेचा पूर्ण पुरेपूर वापर, पण मतदारांची पहिली पसंती भाजपच’, चंद्रकांत पाटलांचा टोला

Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

Milind Narvekar meets Andhra Pradesh CM Jaganmohan Reddy