AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकारणात आणखी एका ऑडिओ क्लिपने खळबळ, शिंदेंच्या आमदाराने…. तरुणाचे गंभीर आरोप

राज्याच्या राजकारणात सध्या ऑडिओ क्लिपनं धुमाकूळ घातला आहे. आता आणखी एका बड्या नेत्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये आमदाराने भयंकर शिवीगळ केलेलीही ऐकायला मिळतेय. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

राज्याच्या राजकारणात आणखी एका ऑडिओ क्लिपने खळबळ, शिंदेंच्या आमदाराने.... तरुणाचे गंभीर आरोप
hemant patil audio clip viral on social mediaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 3:20 PM
Share

सध्या राज्याच्या राजकारणा मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपनं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, भाजपचे नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून आले होते. त्यानंतर शिंदेंनी रामदास कदमांना शांत राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली. पण आता ते प्रकरण पूर्णपणे शांत होतं की नाही याबाबत शंका असताना आता राज्यात आणखी एका ऑडिओ क्लिपने खळबळ उडवून दिली आहे. ही क्लिपही एका मोठ्या राजकीय नेत्याचीच आहे. कथितरित्या ही क्लिप शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांची असल्याचं म्हटलं जात आहे. या क्लिपमध्ये त्यांच्यासोबत एक शेतकरी संवाद साधताना दिसत आहे, पण अचानक या दोघांच्या संवादामध्ये तणाव तयार होतो आणि शिवीगाळ केली जाते, असं ऐकायला मिळतं. पण या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही ९ मराठी करत नाही.

क्लिपमध्ये नेमकं काय?

नांदेडमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांच्याकडून एका जणास अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हेमंत पाटलांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. एका व्हिडिओव्दारे तरुणाकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. लोहा तालुक्यातील पिंपळगाव येथील भगवान येवले नावाच्या तरुणाला शिवीगाळ केल्याचा हा ऑडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तरुणाकडून धमकीचे आरोप

दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटलांबद्दल केलेल्या विधानावरुन भगवान येवलेने हेमंत पाटलांना फोन केला होता. त्याने हेमंत पाटलांना स्पष्टीकरण देण्यासाठी विचारलं असता हेमंत पाटलांनी कॉल रेकॉर्ड करतो का? तुला घरात घुसून बुटाने मारेन, अशा प्रकारची धमकी दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. पुढे भगवान येवले या तरुणाला अश्लील भाषेत शिवीगाळ वाढल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, पोलिसांकडून मारहाण करायला लावल्याचाही गंभीर आरोप येवले नावाच्या तरुणाने केला आहे.

Follow Us
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी