शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना भाजपशी युती भोवणार, पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता

लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्या हकालपट्टीनंतर आता तानाजी सावंत यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी होणार असल्याची शक्यता वर्तवली (solapur tanaji sawant Expulsion from Shivsena) जात आहे. 

शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना भाजपशी युती भोवणार, पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता

सोलापूर : मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याने सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्या हकालपट्टीनंतर आता तानाजी सावंत यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी होणार असल्याची शक्यता वर्तवली (solapur tanaji sawant Expulsion from Shivsena) जात आहे.

सोलापूर आणि उस्मानाबादमधील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आमदार तानाजी सावंत यांची पक्षातील हकालपट्टीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार तानाजी सावंत हटाव, यासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने लक्ष्मीकांत पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुरुषोत्तम बरडे यांची प्रभारी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मीकांत पाटील हे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे यासाठी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. तसेच लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार तानाजी सावंत यांना सहकार्य केल्याचेही बोललं जात (solapur tanaji sawant Expulsion from Shivsena) आहे.

राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचा पॅटर्न उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमलात आणला जाणार होता. मात्र तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपला साथ दिली होती. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांच्या गटातील सात सदस्यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली.

त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सुद्धा सावंत यांनी दांडी मारली होती, आमदार सावंत यांच्या या कृतीमुळे शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. त्यामुळे सोलापुरात तानाजी सावंत यांना खेकड्याची उपमा देत “हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा,” अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी केली आहे. हा बॅनर सोलापुरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

त्यामुळे आज मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत आमदार तानाजी सावंत यांच्या बाबतीत काय निर्णय होतो? याची उत्सुकता (solapur tanaji sawant Expulsion from Shivsena) लागली आहे

संबंधित बातम्या : 

हा खेकडा शिवसेना पोखरतोय, उद्धवसाहेब वेळीच नांग्या मोडा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी

‘तीर’ ऐसा लगा… शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांची भाजपशी युती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *