ईशान्य मुंबईचा तिढा कायम, किरीट सोमय्यांचा पत्ता कट होणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : ईशान्य मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या हे पुन्हा त्याच जागेवरुन लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, शिवसेना सोमय्यांच्या उमेदवारीविरोधात आहे. त्यामुळे सोमय्यांच्या अडचणी वाढतच आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमय्यांना भेट नाकारली होती. त्यानंतर आज मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड आणि किरीट सोमय्या यांची महत्वाची बैठक […]

ईशान्य मुंबईचा तिढा कायम, किरीट सोमय्यांचा पत्ता कट होणार?
Follow us on

मुंबई : ईशान्य मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या हे पुन्हा त्याच जागेवरुन लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, शिवसेना सोमय्यांच्या उमेदवारीविरोधात आहे. त्यामुळे सोमय्यांच्या अडचणी वाढतच आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमय्यांना भेट नाकारली होती. त्यानंतर आज मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड आणि किरीट सोमय्या यांची महत्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीतून कुठलाही मार्ग निघाला नाही.

शिवसेनेनं किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमकपणे मोर्चे बांधणी कायम ठेवली आहे. त्यामुळे वर्षा बैठकीनंतर समन्वयक प्रसाद लाड आणि किरीट सोमय्या यांची मातोश्रीवर होणारी बैठक रद्द झाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांना ‘मातोश्री’वर नो एन्ट्री कायम ठेवण्यात आली आहे. या प्रतिकूल राजकीय परीस्थितीमुळे किरीट सोमय्या यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्यात जमा आहे.

शिवसेनेसोबत चर्चा करुन या समस्येवर तोडगा काढण्याचे सोमय्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजप आता नवा उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. भाजप किरीट सोमय्या यांच्या ऐवजी कुणाला उमेदवारी देते, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

किरीट सोमय्यांना शिवसेनेचा विरोध का?

मुंबई महापालिका निवडणुकीवेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी सोमय्यांनी उद्धव ठाकरेंसाठी माफिया हा शब्द वापरला होता. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये किरीट सोमय्या यांच्याबद्दल नाराजी आहे. याच प्रकरणामुळे किरीट सोमय्यांना उमेदवारी देण्यास शिवसैनिकांचा विरोध आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंवर टीका करणं सोमय्यांना चांगलचं भोवलं आहे.

किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी देण्यास शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला. त्यातच, किरीट सोमय्यांना भाजपने तिकीट दिल्यास आपणही उमेदवारी अर्ज दाखल करणार, असा इशारा शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी दिला.

संबंधित बातम्या :

किरीट सोमय्यांची ‘मातोश्री’वर जाण्याची धडपड, उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!

सोमय्यांना तिकीट नकोच, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

किरीट सोमय्यांऐवजी ईशान्य मुंबईतून प्रकाश मेहतांच्या नावावर शिक्कामोर्तब?

राज्यातील या सात मतदारसंघांचा तिढा अजूनही कायम