किरीट सोमय्यांऐवजी ईशान्य मुंबईतून प्रकाश मेहतांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई : भाजप आणि शिवसेना युतीचे जवळपास सर्व उमेदवार जाहीर झाले असले, तरी अजून ईशान्य मुंबईतला उमेदवार जाहीर झालेला नाही. युतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेची नाराजी आहे. त्यामुळे या जागेसाठी गृहनिर्माण मंत्री आणि भाजप नेते प्रकाश मेहता यांच्या नावाची चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक …

Mumbai North-East, किरीट सोमय्यांऐवजी ईशान्य मुंबईतून प्रकाश मेहतांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई : भाजप आणि शिवसेना युतीचे जवळपास सर्व उमेदवार जाहीर झाले असले, तरी अजून ईशान्य मुंबईतला उमेदवार जाहीर झालेला नाही. युतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेची नाराजी आहे. त्यामुळे या जागेसाठी गृहनिर्माण मंत्री आणि भाजप नेते प्रकाश मेहता यांच्या नावाची चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रमुख मंत्र्यांसह ईशान्य मुंबईचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक घेण्यात येत आहे. किरीट सोमय्या यांच्या कामगिरीविषयी तक्रार नसली तरी शिवसेना आणि सोमय्यांचं जमत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती. त्याचाच राग अजूनही शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे.

प्रकाश मेहता हे सध्या गृहनिर्माण मंत्री असून ते घाटकोपर पूर्व मतदारसंघातून सहा वेळा आमदार आहेत. मुंबई भाजपमधील एक प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शिवाय नुकताच प्रविण छेडा यांना काँग्रेसमधून भाजपात आणण्यात प्रकाश मेहतांचा मोठा वाटा होता. प्रविण छेडा हे अगोदर भाजपातच होते, पण त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण लोकसभेच्या दृष्टीने प्रकाश मेहतांनीही तयारी सुरु केल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून होतं.

उत्तर प्रदेशात मोठी उलथापालथ, भाजपची 29 जणांची यादी जाहीर

Mumbai North-East, किरीट सोमय्यांऐवजी ईशान्य मुंबईतून प्रकाश मेहतांच्या नावावर शिक्कामोर्तब?

Mumbai North-East, किरीट सोमय्यांऐवजी ईशान्य मुंबईतून प्रकाश मेहतांच्या नावावर शिक्कामोर्तब?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *