सोमय्यांना उमेदवारी दिल्यास, त्यांच्याविरोधात लाढणार : शिवसेना आमदार

सोमय्यांना उमेदवारी दिल्यास, त्यांच्याविरोधात लाढणार : शिवसेना आमदार


मुंबई : भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या समोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. ईशान्य मुंबईतून भाजपचे विद्यमान खासदार असलेले किरीट सोमय्या हे पुन्हा लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांना तिकीट मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. मुंबई महापालिका निवणडणुकीवेळी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या किरीट सोमय्या यांना आता ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यातच, किरीट सोमय्यांना भाजपने तिकीट दिल्यास आपणही उमेदवारी अर्ज दाखल करणार, असा इशारा शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या काळात शिवेसना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. माफिया असाही शब्द किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंसाठी वापरला होता. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये किरीट सोमय्या यांच्याबद्दल कमालीची नाराजी आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांना उमेदवारी देण्यास शिवसैनिकांनी विरोध केला आहे.

किरीट सोमय्यांची ‘मातोश्री’वर जाण्याची धडपड, उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!

शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी तर थेट किरीट सोमय्यांविरोधात बंडच पुकारण्याची घोषणा केली आहे. भाजपने किरीट सोमय्यांना उमेदवारी दिल्यास, त्यांच्याविरोधात अर्ज भरणार, असा इशारा शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे.

एकंदरीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका करणाऱ्या किरीट सोमय्या यांना, त्यावेळीची टीका भोवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ईशान्य मुंबईतून पुन्हा एकदा लढण्यास किरीट सोमय्या इच्छुक आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीत थेट उद्धव ठाकरेंशी पंगा घेतलेल्या किरीट सोमय्या यांना तिकीट मिळणं अवघड होऊन बसलं आहे. आता किरीट सोमय्यांच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच करणार आहेत.

ईशान्य मुंबईतील उमेदवारीवरुन अजूनही भाजपचा निर्णय झालेला नाही. स्थानिक शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने, भाजप काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरीट सोमय्या यांनाच ईशान्य मुंबईतून तिकीट मिळतं की भाजपकडून नवा उमेदवार दिला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI