Babasaheb Purandare Death | शिवशाहीरांच्या निधनावर मोदींचं ट्विट, गडकरी, राऊत, इतर नेते नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 15, 2021 | 10:09 AM

मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे.

Babasaheb Purandare Death | शिवशाहीरांच्या निधनावर मोदींचं ट्विट, गडकरी, राऊत, इतर नेते नेमकं काय म्हणाले?
babasaheb-purandare death
Follow us on

पुणे : मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे.

शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने राजकीय विश्वासही दु:खद वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलं आहेत.

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झालीये – पंतप्रधान मोदी

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या बातमीने मन अत्यंत व्यथित झाले आहे – अमित शाह

शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मनाला अतिशय वेदना होत आहेत, त्यांच्या आठवणी डोळ्यापुढे येत आहेत – फडणवीस

महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला – अजित पवार

महाराष्ट्राचे दैवत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जाणे अत्यंत वेदनादायी आणि दुःखद – नितीन गडकरी

आपण आमचे जीवन समृद्ध केलेत – संजय राऊत

नाट्यक्षेत्राशी संबंधित असणारे अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड – सुप्रिया सुळे

सकाळी 10 ते 10.30 दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील

गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं सांगण्यात आलं. काल त्यांच्या निधनाची अफवा पसरली. त्यानंतर, मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं. सकाळी साडे आठ वाजता बाबासाहेबांचं पार्थिव त्यांच्या पर्वती इथल्या निवासस्थानी घेऊन जाण्यात येईल. तर सकाळी 10 ते 10.30 दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहितीही डॉक्टरांनी दिलीये.

संबंधित बातम्या –

Video: जेव्हा मोदींनी हात जोडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना साष्टांग नमस्कार केला

Shivshahir Babasaheb Purandare Passes Away | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन, छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहोचवणारा शाहीर काळाच्या पडद्याआड