AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस ठाण्यात साजरा झाला खासदाराचा वाढदिवस, राष्ट्रवादीने केली मोठी मागणी

पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपरोधिक टीका केली आहे. या टीकेनंतर ठाणे शहरात शिंदे गट व राष्ट्रवादी असा संघर्ष होणार आहे. 

पोलीस ठाण्यात साजरा झाला खासदाराचा वाढदिवस, राष्ट्रवादीने केली मोठी मागणी
श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 06, 2023 | 12:07 PM
Share

ठाणे : खासदार श्रीकांत शिंदे (mp shrikant shinde) यांचा वाढदिवस ४ फेब्रवारी रोजी होता. त्यानिमित्त त्यांच्यावर विविध ठिकाणांवरुन शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोस्टर्स पाहायला मिळाले. तसंच ठाणे शहरातही (Thane City) पोस्टर्स लागले होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.  परंतु त्यांच्या वाढदिवसावरुन आता राजकारण (Politics) रंगणार असल्याची चिन्ह आहेत. त्यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा झाला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपरोधिक टीका केली आहे.

श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस नौपाडा पौलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यात केक कापण्यात आला. उपायुक्त गणेश गावडे यांनी त्यांना केक भरवला. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रसने टीका केली आहे.

काय म्हणाले आनंद परांजपे

श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात केक कापण्यात आला. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्यात स्तुत्य उपक्रम झाला. केक कापण्यात आला. केक एकमेकांना भरवण्यात आला. गणवेश वाटप झाले. यामुळे पोलीस महासंचालक रजनीश शेठ व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहिणार आहे. या पत्रात पोलीस ठाण्यात सर्वच राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्याची परवानगी देण्याची मागणी करणार आहे.

गणवेशाचा खर्च वाचणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले, की पोलिसांना गणवेश वाटप सरकारकडून केले जाते. त्यांना त्यासाठी धुलाई भत्ताही दिला जातो. त्यांच्या सर्व्हीस बुका हे दिले आहे. परंतु राजकीय नेत्यांकडून गणवेश मिळत असतील तर राज्य सरकारचा खर्च वाचेल. यामुळे सरकारने पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणे व गणवेश वाटप करण्याची परवानगी द्यावी. म्हणजे राष्ट्रवादी पक्ष ठाणे शहरात हा उपक्रम राबवेल. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस इतर ठिकाणी हा उपक्रम राबवणार, असा टोला त्यांनी लगावला.

पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न

पोलीस ठाण्यात झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे. प्रत्येक ठाणेकरांचा मनात हा प्रश्न असणार आहे. आपण एखादा राजकीय पक्षाच्या नेत्यांचा वाढदिवस साजरा करतो, गणवेश घेतो तेव्हा शहरातील नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणार, हे निश्चित, असे आनंद पराजपे यांनी सांगितले.

श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानंतर ९ फेब्रवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. ठाणे शहरात मोठा धडाक्यात साजरा करण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?