AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेत अपक्ष जिंकला, आता विधानसभेची तयारी, श्रीपाद छिंदमला कुणाची उमेदवारी?

छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) नगर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आला.

महापालिकेत अपक्ष जिंकला, आता विधानसभेची तयारी, श्रीपाद छिंदमला कुणाची उमेदवारी?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 30, 2019 | 1:45 PM
Share

अहमदनगर: छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) नगर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आला. मात्र आता श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. श्रीपाद छिंदमने महाराष्ट्र विधानसभेची तयारी केली आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याने उमेदवारी अर्ज नेला आहे.

श्रीपाद छिंदमला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र छिंदमने नगर महापालिका निवडणूक ज्याप्रमाणे अपक्ष लढून जिंकून दाखवली होती, तसंच विधानसभेची निवडणूकही अपक्ष लढण्याची तयारी छिंदमची आहे.

नगर महापालिका निवडणुकीत विजय

9 डिसेंबर 2018  रोजी अहमदनगर महापालिकेची निवडणूक झाली आणि 10 डिसेंबरला निकाल लागला. श्रीपाद छिंदम अहमदनगरमधील प्रभाग क्रमांक नऊमधून तब्बल 1970 मतांनी निवडून आला. छिंदमला एकूण 4532 मतं मिळाली. तर त्याच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना 2562 मतं मिळाली. अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार 100 ते 200 मतांच्या फरकाने पडले. पण छिंदमचा विजय तब्बल 1970 मतांनी झाला.

गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर जिंकून आलेल्या छिंदमला उपमहापौर करण्यात आलं होतं. मात्र शिवरायांविषयी बरळल्यानंतर त्याच्याविरोधात सर्वसामान्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली होती.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान

श्रीपाद छिंदम हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लिल शब्द वापरुन आक्षेपार्ह बरळला होता. त्यावेळी सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली. शिवप्रेमींनी छिंदमला चोपही दिला होता. सुरक्षेसाठी नगरमधून छिंदमला बाहेर हलवण्यात आले होते. मात्र, काही दिवस लोटल्यानंतर छिंदम पुन्हा राजकारणात सक्रीय आहे.

संबंधित बातम्या   

नगरचं उपमहापौरपद शापित, ज्यांनी पद भूषवलं त्या सर्वांची अवस्था काय?

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम नगरमधून तडीपार

विजयानंतर श्रीपाद छिंदम शिवरायांसमोर नतमस्तक   

स्पेशल रिपोर्ट : वादग्रस्त श्रीपाद छिंदम विजयी    

शिवसेनेने माझ्याकडे मदत मागितली, छिंदमकडून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल 

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल