AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाळासाहेबांनी मला 28 व्या वर्षी संपादक बनवलं, म्हणून….’ कुणाल कामराच्या ‘त्या’ प्रश्नावर संजय राऊतांचं भावनिक उत्तर

या खास मुलाखतीमध्ये संजय राऊत यांना खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

'बाळासाहेबांनी मला 28 व्या वर्षी संपादक बनवलं, म्हणून....' कुणाल कामराच्या 'त्या' प्रश्नावर संजय राऊतांचं भावनिक उत्तर
| Edited By: | Updated on: Nov 14, 2020 | 11:31 AM
Share

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader) यांची स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (kunal kamra) याने घेतली मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे. या खास मुलाखतीमध्ये संजय राऊत यांना खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांनी मला 28 व्या वर्षी संपादक बनवलं. मी खूप कमी वयात सामनाचा संपादक झालो. त्यामुळे माझं कोणतंही खासगी आयुष्य नाही असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. (shut up ya kunal sanjay raut interview by kunal kamra podcast)

या खास मुलाखतीमध्ये राऊतांनी महाविकास आघाडीचं सरकार, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रानौत, भाजप आणि कोरोना संसर्गासंदर्भात मनमोकळी चर्चा करत कुणाल कामराच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. यावेळी संजय राऊतांनी त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक क्षणही या मुलाखतीत सांगितला.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वीच ‘शट अप या कुणाल’ (Shut up Ya kunal) या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यामध्ये संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर खास चर्चा केली आहे.

‘मला बाळासाहेबांनी 28व्या वर्षी संपादक बनवलं’ कुणाल कामरा याने संजय राऊतांना खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला असता राऊतांनी बाळासाहेबांची आठवण करून देत मला खासगी आयुष्य नाही ते मी मानत नाही असं उत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘मी खूप कमी वयात सामनाचा संपादक झालो. त्यामुळे माझं पर्सनल आयुष्य तिथेच संपलं. मी पूर्ण वेळ माझ्या कामाला देतो. बाळासाहेबांसोबत काम करणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी पूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत लावलं आहे. बाळासाहेबांनी मला वयाच्या 28 व्या वर्षी सामनाचा संपादक बनवलं.’ (shut up ya kunal sanjay raut interview by kunal kamra podcast)

‘सामना एक राजकीय वृत्तपत्र आहे. बाळासाहेब त्याचे प्रमुख होते. त्यांच्यासोबत काम करणं, त्यांच्या विचारांना पुढे नेणं हे त्यावेळी खूप महत्त्वाचं होतं. भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. प्रत्येक राज्यातील नागरिकांना सगळ्यात आधी रोजगाराचा हक्क मिळाला पाहिजे असं त्यांचं मत होतं. मराठी माणसासाठी महाराष्ट्र आहे. देश एक असला तरी प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे. यासाठी लढलं पाहिजे’ असंही राऊतांनी म्हटलं.

इतर बातम्या –

अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस देण्यासाठी ‘प्रोत्साहन पॅकेज’ जाहीर, किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेलच, शिवसेनेचा टोला

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

(shut up ya kunal sanjay raut interview by kunal kamra podcast)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.