जितेंद्र आव्हाडांची व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर उपस्थिती, सिंधुदुर्गातील पहिला ऑनलाईन पक्षप्रवेश

| Updated on: Aug 31, 2020 | 5:34 PM

अनंत पिळणकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत असल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले

जितेंद्र आव्हाडांची व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर उपस्थिती, सिंधुदुर्गातील पहिला ऑनलाईन पक्षप्रवेश
Follow us on

सिंधुदुर्ग : कोरोना काळातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला ऑनलाईन पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप कॉलवरुन सामाजिक कार्यकर्ते अनंत पिळणकर यांचा प्रवेश झाला. (Sindhudurg Anant Pilankar enters NCP, Minister Jitendra Awhad attends via Whatsapp Call)

फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत पिळणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जाहीर केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पिळणकर यांनी राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला.

अनंत पिळणकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत असल्याचे नियुक्तीपत्र पक्षप्रवेशानंतर सामंत यांच्या हस्ते पिळणकर यांना देण्यात आले.

हेही वाचा : चंद्रकांत खैरे यांना धक्का, औरंगाबादेतील सात निष्ठावंत शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

“राष्ट्रवादी हा जनतेच्या मनात घर केलेला पक्ष आहे. केवळ सिंधुदुर्गच नव्हे, तर कोकणासाठी शरद पवार यांनी केलेली विकास कामे अद्वितीय आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुनरउभारणी करण्याचे काम जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांची भेट घेऊन करणार आहे.” असे यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.

अनंत पिळणकर यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे उभा राहील, अशी ग्वाहीसुद्धा सामंत यांनी दिली. अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती धरला होता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला होता. गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जात होते.

संबंधित बातम्या :

राणेंचा बंगला, फडणवीसांची उपस्थिती, शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये

(Sindhudurg Anant Pilankar enters NCP, Minister Jitendra Awhad attends via Whatsapp Call)