राज्यात दंगली घडवून सत्तेत येण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न; नितेश राणे यांचे गंभीर आरोप

Nitesh Rane on Uddhav Thackeray : दंगली, इतिहास अन् उद्धव ठाकरे यांचे मनसुबे; नितेश राणे यांचे गंभीर आरोप

राज्यात दंगली घडवून सत्तेत येण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न; नितेश राणे यांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 11:25 AM

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. “ह्या ज्या दंगली होत आहेत त्याचा मास्टर माईंड सिल्व्हर ओकमध्ये आलेला… शरद पवार साहेबांच्या बाजूला बसला होता. कलानगर हा त्याचा पत्ता आहे… दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याची स्वप्न आजही जिवंत आहेत. 1993 ला दंगली झाल्या आणि 1995 ला सत्ता आली. अशी उद्धवजींची धारणा आहे. 2004 ला झालेल्या बैठकीत माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याबाबत पुष्टी देऊ शकतात. या दंगली मध्ये उद्धवजी मास्टर माईंड आहेत का? याची चौकशी व्हावी”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

ठाकरेगटाचे दोन नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे एकमेकांचं तोंड बघत नव्हते. त्यांचे सूर मिळायला लागले आहे. ते आज पुन्हा एकत्र येत आहेत. हा दंगलीचा प्लॅन आहे का? मुसलमान समाजात दंगली घडवून आपला मतदान वाढवायचं हा उद्धवजींचा प्लॅन परत एकदा होतोय का? हे पवार साहेबांनी ओळखावं. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्ती चादर टाकण्याचा प्रयत्न झाला. हट्ट धरतात. आधी महाराजांच्या गडकिल्ल्यावर अतिक्रमण सुरू केलं. आता तर धार्मिक स्थळाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उद्या घरात देखील येतील, असं नितेश राणे म्हणालेत.

कर्नाटकमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला येतात. काँग्रेसचे खरे मनसुभे उघडे पडतात. त्यांना महत्वाची खाती देण्याची काँग्रेसची कमिटमेंट आहे. असाच प्रयत्न त्यांच्या धार्मिक स्थळावर झाला तर पूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटला असता. हिंदू एकत्र येत नाहीत हे त्यांना माहीत आहे. हिंदू समाज झोपला आहे. ही शोकांतिका आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

आम्हाला हिंदू समाजाची साथ मिळाली पाहिजे. कर्नाटकात जिहादीची सत्ता आली आहे.तेच चित्र महाराष्ट्र राज्यात तयार व्हावं यासाठी रजा अकादमी, ठाकरेगट आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक झाली. चादर चडविणे, छत्रपतींच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचे आदेश, पूर्वनियोजित प्लॅन आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव आणि आदित्य 10 जनपथ ला का गेलेले? झाडू मारण्यासाठी गेलेले का मातोश्रीचा पोपट मेलेला आहे हे आमचे अध्यक्ष लवकरच जाहीर करतील, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.