SMC Election 2022 : सोलापूर महापालिकेवर कमळ फुलले पण प्रभाग क्रमांक 14 मध्ये एमआयएमचे वर्चस्व..! यंदा काय होणार?

| Updated on: Aug 06, 2022 | 6:21 PM

महापालिका निवडणुका लांबणीवर पडलेल्या असल्या तरी राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाने हद्दी ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभागाची व्याप्ती कोठून कुठपर्यंत राहणार हे सांगता येणार आहे. प्रभाग क्र. 14 मध्ये यंदा तीनच वार्ड राहणार आहेत. प्रभाग क्रमांक 14 ची लोकसंख्या ही 26 हजार 826 एवढी आहे. तर यामध्ये उत्तर कसबा भाग, दक्षिण कसबा भाग, पूर्व मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, जोडभावी पेठ चा समावेश होतो.

SMC Election 2022 : सोलापूर महापालिकेवर कमळ फुलले पण प्रभाग क्रमांक 14 मध्ये एमआयएमचे वर्चस्व..! यंदा काय होणार?
सोलापूर महापालिका
Follow us on

सोलापूर : (Solapur) सोलापूरच्या जनतेने अधिक काळ महापालिकेवर कुणाचेच वर्चस्व टिकू दिलेले नाही. सत्तेमध्ये बदल हेच (Municipal Election) महापालिकेचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजपाला एकतर्फी विजय खेचून आणता आला असला तरी प्रभाग क्रमांक 14 चे चित्र हे वेगळेच होते. या प्रभागातील 4 वार्डामध्ये एकही (BJP Party) भाजपाचा उमेदवार निवडुण आलेला नव्हता. तीन एमआयएमचे तर एक नगरसेवक हा कॉंग्रेसचा होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर राज्याच्या राजकारणाचा परिणाम होतोच असे नाही. मतदार बदलही स्विकारतात त्याबरोबर शहराच्या हिताच्या दृष्टीने काय राहिले याचाही विचार करतात. महापालिकेवर भाजपाची सत्ता असली तरी प्रभाग क्र. 14 राजकीय गणिते ही वेगळी आहेत. त्यांचा यंदा होऊ घात असलेल्या  निवडणुकांवर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 113 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 16, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 48 जागा राखीव आहेत.सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत.

महापालिकेवर फुलले कमळ, प्रभागात काय?

सोलापूर महापालिकेतील निवडणुकीचे चित्र हे कायम वेगळे राहिलेले आहे. आता प्रभाग क्रमांक 13 मध्ये वार्ड सोडता तिन्हीही वार्ड भाजपाकडे होते. 14 मध्ये मात्र, भाजपाच्या एकाही उमेदवाराला मतदारांनी संधी दिलेली नाही. तीन वार्डामध्ये एमआयएमचे नगरसेवक तर एका वार्डामध्ये कॉंग्रेसचा नगरसेवक असेच चित्र आहे. मात्र, गत पाच वर्षात प्रभागात झालेल्या विकास कामावरच सर्वकाही अवलंबून आहे. या प्रभागातील ‘अ’ वार्डात कॉंग्रेसचे रफिक हत्तुरे, ‘ब’ मध्ये एमआयएमचे रियाज खैरडी, ‘क’ मध्ये एमआयएमचे शहजीदाबनो तर ड मध्ये वाहिदाबनो यांना संधी मिळाली होती.

महापालिकेच स्वरुप कसे?

सोलापूर महापालिकेवर भाजपाचे वर्चस्व असले तरी प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण या प्रभागात भाजपाला गत निवडणुकीच खातेही खोलता आले नव्हते. मात्र, मोदी लाटेचा थेट परिणाम महापालिका निवडणुकांवर झालेला होता. सोलापूर महापालिकेत एकूण 113 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 16, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 48 जागा राखीव आहेत. सोलापूरची लोकसंख्या 9 लाख 51 हजार 558 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 38 हजार 078 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 17 हजार 982 एवढी आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत.

प्रभाग क्रमांक 14 मधील महत्वाचा परिसर

महापालिका निवडणुका लांबणीवर पडलेल्या असल्या तरी राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाने हद्दी ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभागाची व्याप्ती कोठून कुठपर्यंत राहणार हे सांगता येणार आहे. प्रभाग क्र. 14 मध्ये यंदा तीनच वार्ड राहणार आहेत. प्रभाग क्रमांक 14 ची लोकसंख्या ही 26 हजार 826 एवढी आहे. तर यामध्ये उत्तर कसबा भाग, दक्षिण कसबा भाग, पूर्व मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, जोडभावी पेठ चा समावेश होतो. शिवाय या मुख्य भागांमध्ये पुन्हा गल्ली आणि बोळांचा सहभाग हा वेगळा. शिवाय यंदा वार्ड रचनेत बदल झाला असून कोणत्या भागाचा कुठे समावेश होणार हे आताच सांगता येणार नाही.

आरक्षणावर सर्वकाही अवलंबून

प्रभागाच्या हद्दीबरोबर त्या प्रभागात आरक्षणाची काय स्थिती आहे यावरही बरेच काही अवलंबून आहे. प्रभाग 14 मध्ये यंदा होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये तीनच वार्ड राहणार आहेत. या प्रभागातील ‘अ’ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी, ‘ब’ हा वार्ड सुध्दा सर्वसाधारण महिलेसाठीच तर ‘क’ हा वार्ड सर्वसाधारणसाठी खुला राहणार आहे. या प्रभागाची लोकसंख्या ही 26 हजार 826 एवढी आहे. तर यामध्ये अनुसूचित जातीचे 1 हजार 515 तर अनुसूचित जमातीचे केवळ 131 मतदार आहेत. त्यामुळे सर्वकाही सर्वसाधारण वर्गावरच अवलंबून आहे.

सोलापूर महापालिका प्रभाग 14 ‘अ’

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

सोलापूर महापालिका प्रभाग 14 ‘ब’

पक्ष उमेदवारविजयी आघाडी
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

सोलापूर महापालिका प्रभाग 14 ‘क’

पक्ष उमेदवारविजयी/ आघाडी
राष्ट्रवादी
भाजपा
कॉंग्रेस
शिवसेना
मनसे
इतर