Nashik | ‘नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा’, राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात ‘दंगल’

| Updated on: Dec 12, 2020 | 7:10 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील नाशिक महापौर शिवसेनेचा होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच दंगल सुरु झालीय.

Nashik | नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा, राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात दंगल
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील नाशिक महापौर शिवसेनेचा होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच दंगल सुरु झालीय. राऊत कुठल्या जोरावर ही गोष्ट बोलताहेत हीच कल्पना विरोधकांना येत नाहीये. त्यामुळेच राऊतांच्या दाव्याविषयी तर्कवितर्क लावण्यास उधाण आलंय (Special report on Sanjay Raut claim about Nashik corporation Mayor Election).

सध्या नाशिक मनपावर भाजपचं वर्चस्व आहे. भाजपचे सतीश कुलकर्णी हे नाशिकचे विद्यमान महापौर आहे. मात्र आता महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्रित लढणार आहे. त्यामुळे भाजपला निवडणुकीत कडवी झुंज द्यावी लागणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतही याची प्रचिती आलीय. आता त्याच्या पुढील निवडणुकींचा हा ट्रेलर असल्याचं बोललं जातंय. मात्र कुणी कितीही आघाड्या केल्या, तरी भाजपच यशाचा झेंडा फडकवेल, असा दावा भाजप भाजप नेते लक्ष्मण सावजी यांनी केलाय.

तिकडं मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची कसून तयारी करतेय. भाजपनं मनसेचे अनेक नगरसेवक पळवले. त्यामुळं स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. मात्र, असं असलं तरी मनसेची भूमिका कृष्णकुंजवरच ठरणार आहे.

नाशिक मनपामध्ये पक्षीय बलाबल

भाजप – 65
शिवसेना – 35
राष्ट्रवादी – 6
काँग्रेस – 6
मनसे – 6
रिपाई – 1

नाशिकमध्ये मनसे फॅक्टरचा झटका शिवसेनाला बसू शकतो. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वामुळंही शिवसेनेचा महापौर होणं अवघड असल्याचं राजकीय विश्लेषक सांगताहेत. नाशिक मनपाच्या निवडणुका भाजप आणि मनसेसाठी महत्त्वाच्या आहेत. मात्र, शिवसेनेसाठी या निवडणुका त्याहुनही जास्त महत्त्वाच्या आहेत. कारण या मतदारसंघात शिवसैनिक 2 गटात विभागला गेलाय. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाचा फटकाही शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं नाशिक मनपाचा गड सर करण्यासाठी शिवसेना काय रणनिती ठरवतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा :

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच; संजय राऊतांचा दावा

बाळासाहेब, पवारांचे बोट धरून पुढे आलो; पवारांचे वय मोजू नये: संजय राऊत

भाजपनं पराभवाचा राग ‘गव्या’वर काढला का? राऊतांनी पुन्हा डिवचलं

Special report on Sanjay Raut claim about Nashik corporation Mayor Election