AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपनं पराभवाचा राग ‘गव्या’वर काढला का? राऊतांनी पुन्हा डिवचलं

त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? अशी अप्रत्यक्ष टीका संजय राऊतांनी केली. (Sanjay Raut On Pune gava death)

भाजपनं पराभवाचा राग 'गव्या'वर काढला का? राऊतांनी पुन्हा डिवचलं
| Updated on: Dec 11, 2020 | 11:13 AM
Share

मुंबई : पुण्यात जंगलाची वाट चुकून मानवी वस्तीत शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यू झाला होता. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपला डिवचलं. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? अशी अप्रत्यक्ष टीका संजय राऊतांनी केली. (Sanjay Raut On Pune gava death)

“माणूस हा दंगली जमावापेक्षा जास्त हिंसक झाला आहे. एकाबाजूला आपण पर्यावरण, डोंगरांचे रक्षण करतो. नद्यांसाठी मोठे प्रोजेक्ट आणतो. वाघ बचाव, सिंह बचाव यात रान गव्यासाठी प्राणी येत नाहीत का? एक रानगवा चुकून पुणे शहरात आला असेल, पण त्याला अशाप्रकारे क्रूरपणे मारणं हे माणुसकीच्या कोणत्या धर्मात बसतं? ज्यापद्धतीने लोकं त्याच्या मागे लागले होते. ते अत्यंत संतापजनक होतं,” असं संजय राऊत म्हणाले.

“रानगवा हा इतका शक्तीमान प्राणी असूनही हृदयविकाराचा झटक्याने मरण पावला. कुठेतरी जंगल खात्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. का फक्त वाघाला साखळी लावून पकडणं, इथपर्यंत जंगल खात्याचे काम नाही. असे असंख्य प्राणी आहेत.  आपण जंगलावर अतिक्रमण केल्यामुळे ते आपल्या भागात येत आहेत. आपण जंगलात शिरलो आहे, फार्महाऊस बांधतो, गाड्या घेऊन फिरतो. त्यातील पाणी चारा संपतो आहे. आपण त्यांना वाचवलं पाहिजे,” असेही राऊतांनी म्हटले.

“शिक्षक पदवीधर मतदारसंघात काही रानगव्यांनी पुणेकरांनी वेसण घातली आहे. नागपूरलाही घातली. त्यामुळे हिंसा वाढली असावी,” असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

काय लिहिलं आहे सामना अग्रलेखात? 

एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे!, असे संजय राऊतांनी अग्रलेखात म्हटलं.  (Sanjay Raut On Pune gava death)

संबंधित बातम्या : 

‘आम्ही गुन्हेगार, आम्हाला माफ कर’; पुण्यात झळकले रानगव्याची माफी मागणारे बॅनर

‘मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबलाही माणुसकीने वागवलं पण पुणेकरांनी रानगव्यास मारुन दाखवलं!’

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.