AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांनीच खरा एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला, पडळकरांचा हल्लाबोल; फडणवीसांसोबत सविस्तर चर्चा

आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनीही फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय.

शरद पवार यांनीच खरा एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला, पडळकरांचा हल्लाबोल; फडणवीसांसोबत सविस्तर चर्चा
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
| Edited By: sagar joshi | Updated on: Nov 18, 2021 | 6:10 PM
Share

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन आता राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन भेटीगाठीचा सिलसिलाही सुरु आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनीही फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. (Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar on the issue of ST employees)

‘शरद पवार यांनीच खऱ्या अर्थाने मागील 50 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला. त्यांची एकमेव संघटना मान्यताप्राप्त आहे. मात्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त संघटनेशीच चर्चा करतं. मात्र आजपर्यंत पवारांच्या संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न राज्य सरकारसमोर कधी मांडेलच नाहीत. सरकार आणि मान्यताप्राप्त संघटनांनी मिळून कर्मचाऱ्यांचा घात केल्याचा घणाघात पडळकर यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार जर 2050 पर्यंत राहिले तर तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनातही ते 1980 आणि 2020 मधल्या भाषणातील मुद्देच सांगतील. जर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले तर त्यांची संघटना उरणार नाही. निवडणुकीवेळी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करता येणार नाही’, असा खोचक टोलाही पडळकर यांनी लगावला आहे. त्याचबरोबर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्यावर आझाद मैदान सोडणार नाही, असंही पडळकर यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं.

‘सरकार कर्मचाऱ्यांना भीती दाखवण्याचं काम करतेय’

सरकार या संपावर मार्ग काढण्याऐवजी भीती दाखवण्याचं काम करत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीसा देत आहे. त्यांना निलंबनाच्या नोटीसा देत आहे. आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. पण तुम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काही बोलतच नसाल तर त्यातून मार्ग कसा निघेल. देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग कसा निघू शकतो याबाबत सरकारला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आम्ही केवळ भांडत नाहीत, तर प्रश्नावरील उत्तरही देत आहोत. त्यामुळे आता मार्ग काढायचा की नाही काढायचा हे सरकारच्या हातात आहे, असं पडळकर म्हणाले.

पवारांनीच मध्यममार्ग सांगावा, खोतांचं आव्हान

पवार साहेब जे म्हणत आहे की मध्य मार्ग काढू, तर आम्ही तरी कुठे म्हणतोय की आडवळणानं जाऊ. मध्यम मार्ग काय आहे तो पवारसाहेब तुम्ही सांगा. ते अभ्यासू व्यक्ती आहेत. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. पण नेमचा त्यांचा मध्य पूर्वेला आहे, दक्षिणेला आहे की उत्तरेला आहे हे मात्र कधीच कुणाला समजून आलं नाही. मला वाटतं की राजकारण राजकारणाच्या जागी राहू द्या. पण ज्या कामगारांनी तुम्हाला मोठं केलं असं त्यांच्या अधिवेशनात सांगता मग त्या कामगारांचे अश्रू पवारसाहेबांना का दिसले नाहीत? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केलाय. तसंच पवार साहेब पावसात भिजले, पण आज एसटी कर्मचारी पवासात भिजतोय, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम पवारसाहेब करत नाहीत, हे या महाराष्ट्राचं दुर्दैवं असल्याचा टोलाही खोत यांनी लगावलाय.

इतर बातम्या :

अनिल परब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार?

नाना पटोले यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला, प्रज्ञा सातव विधान परिषदेवर बिनविरोध जाणार?

Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar on the issue of ST employees

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष