चिपळूण: राज्यातील अनेक नेते एकमेकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका करतात. हाडवैरी असल्यासारखं एकमेकांवर हल्ला चढवतात. त्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते कमालीचे संतापताना दिसतात. पण ही राजकीय लढाई केवळ राजकारणापुरतीच असते. ती कधीच घरापर्यंत पोहोचत नाही. मात्र, कोकणात सध्या वगेळंच काही तरी घडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्या चिपळूण (chiplun) येथील घरावर मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोर अज्ञात आहेत. पण राजकीय लढाई आता घरापर्यंत पोहचली की काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.