AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युतीचा पूल बांधायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य हव्यात, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मुनगंटीवार यांचं सूचक विधान

युतीचा पूल बनवायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य असल्या पाहिजेत, शास्त्रीय दृष्टिकोनातून हा मनाचा पूल भविष्यात बांधला जाऊ शकत नाही, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

युतीचा पूल बांधायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य हव्यात, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मुनगंटीवार यांचं सूचक विधान
चौकशीला का घाबरता? -मुनगंटीवार
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 4:16 PM
Share

नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपची (Shivsena-Bjp Alliance) तीन दशकांची युती संपली आणि आता पहिल्यांदाच महाविकास आघाडी तयार होत राज्यात ठाकरे सरकार (Cm Uddhav Thackeray) आलं. मात्र भाजप आणि शिवसेनेने युतीच्या संसाराचा गाडा जवळपास पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ हाकल्याने मध्ये मध्ये या युतीच्या चर्चा पुन्हा रंगतात. आता मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar Statement) यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चांना बळ आलंय. मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी यावर अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे. युतीचा पूल बनवायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य असल्या पाहिजेत, शास्त्रीय दृष्टिकोनातून हा मनाचा पूल भविष्यात बांधला जाऊ शकत नाही, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. शिवसैनिकांना वाटत असेल एकत्र यावं पण आता आमच्यात इतकं अंतर पडल की आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे वाटत नाही असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत, त्यामुळे या युतीच्या चर्चांना आता तरी ब्रेक लागणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अब्दुल सत्तार म्हणातात हा पूल गडकरीच बांधतील…

महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना यासंदर्भात वक्तव्य केले होते. ते म्हणाले, नितीन गडकरीच सेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. दोन व्यक्तींची मनं जुळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. युतीचा अधिकार माझ्या हातात नाही, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी सिल्लोड येथे बोलताना दिली. हे सांगताना त्यांनी स्पष्टीकरणही दिले. नितीन गडकरी हा माणूस मागील 30 वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी हे वक्तव्य केलं. दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात तर दोन व्यक्तींची मनही जुळवू शकतात. त्यामुळे मी हे विधान केलं. मी कालही तेच विधान केलं आणि आजही करतोय, असा पुनरुच्चान अब्दुल सत्तार यांनी केला.

मिलिंद नार्वेकरांना मुनगंटीवारांचा टोला

नितेश राणे यांच्या जामीन फेटालल्यावरून मिलिंद नार्वेकरांनी ट्विट केलं होतं त्यालाही मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय. सरकारमधील काही माजी मंत्र्यांनाही सूक्ष्म दिलासा दिला गेला , ते अजूनही आत आहेत. थट्टा न करता कायद्याच्या चौकटीतील न्याय सगळ्यांना मिळेल कोणाची थट्टा करायचे कारण नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच औरंगजेब टिपू सुलतान हे आमच्यासाठी खलनायक आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाल विरोध राहणारच. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपली आहे, आजची शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत खुर्ची साठी लढणारी आजची शिवसेना अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

शिवसेना भाजप युतीवर मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा बोलले, नितीन गडकरीच हा पूल बांधू शकतील कारण…

Eknath Khadse : रोहिणी खडसेंचा पराभव छुप्या युतीमुळंच, गिरीश महाजन यांनी भाजप विकली, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर

औरंगाबादेत महाराणा प्रतापांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये; मंत्री अब्दुल सत्तारांचं खा. इम्तियाज जलील यांना आव्हान!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.