AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचं शव हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर भयंकर कारस्थान? सुनिल तटकरेंनी फोडला बॉम्ब; रोख कोणाकडे?

खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिवगंत नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा खळबळजनक दावा शरद पवार यांच्या पक्षातील नेते रोहित पवार यांनी केला आहे. आता त्यांच्या याच आरोपांवर सुनिल तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

अजितदादांचं शव हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर भयंकर कारस्थान? सुनिल तटकरेंनी फोडला बॉम्ब; रोख कोणाकडे?
sunil tatkare and ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 25, 2026 | 6:56 PM
Share

Sunil Tatkare: खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिवगंत नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा खळबळजनक दावा शरद पवार यांच्या पक्षातील नेते रोहित पवार यांनी केला आहे. आता त्यांच्या याच आरोपांवर सुनिल तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्यावर टीका होणे स्वाभाविक आहे. मी कायम अजित पवार यांच्यासोबत होतो. एनडीएत सहभागी होण्यासाठीही आम्ही त्यांच्या पाठीमागे होतो. आम्ही त्यांची सावलीसारखी साथ केली, असे तटकरे यांनी सांगितले. तसेच थोडं शांत बसावं. अन्यथा भविष्यात मला काही गोष्टी सांगाव्या लागतील, असा सूचक इशाराही तटकरे यांनी दिला. तटकरे यांनी दिलेला हा इशारा रोहित पवार यांच्यासाठीच होता, असे बोलले जात आहे.

सुनिल तटकरे नेमकं काय म्हणाले?

“मला अनेकवेळा टार्गेट करण्यात आलं. 2014 साली टार्गेट करण्याचे प्रमाण वाढले आहे. अजितदादांची राज्यातील उंचावलेली प्रतीमा, त्यांनी पक्षावर मिळवलेली पकड यात आमचा सहभाग असल्याने आम्हाला टार्गेट केलं जाणं स्वाभाविक आहे. आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही आम्ही अजित पवार यांच्यासोबत होतो, असे तटकरे यांनी सांगितले.

अन्यथा पुढच्या काळात मला काही गोष्टी…

तसेच अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर त्यांचे शव हॉस्पिटलला आणण्यात आले. त्यानंतर पोस्टमॉर्डमपासून काय काय घडलं, याची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे कृपया थांबा अन्यथा पुढच्या काळात मला काही गोष्टी सांगाव्या लागतील, असा गंभीर इशारा तटकरे यांनी दिला.

सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याविरोधात कटकारस्थान?

तुम्ही सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्याविरोधात काय कटकारस्थान रचत होते याची माहिती आमच्या सर्वांकडे आहे. म्हणून त्यांनी थोडे थांबायला हवे. आपल्याला सुसंस्कृत पद्धतीने पुढे वाटचाल करायची आहे, असे म्हणत हा इशारा ज्याला असेल त्याने तो समजून घ्यावा, असं म्हणत रोहित पवार यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...