NCP Merger : दादा गेल्यानंतर…. ते आमदार पवार साहेंबाना का भेटले? सुप्रिया सुळेंचा NCP विलिनीकरणावर मोठा खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, यासंदर्भात आपल्याकडे आतापर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

दादा गेल्यानंतर दोन्ही पक्षांच्या विलिनीकरण्यासाठी माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी मोठी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. दादा असताना त्याने विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरु केलेले, यावर आपण यापूर्वीही बोललो आहोत. पण अजित दादा गेल्यानंतर आतापर्यंत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
माझ्याकडे कोणताच प्रस्ताव आलेला नाही. माझ्याशी कोणी बोललेले नाही. पवार साहेबांना अनेक लोक भेटत असतात. त्यामुळे त्यामध्ये नविन नाही किंवा वावगे काहीही नाही, अजित पवारांचा गट वेगळा झाला तेव्हाही अनेक लोक पवार साहेंबांना भेटायचे, असं खासदार सुळे म्हणाल्या आहेत. त्यांच्या पक्षामध्ये काय सुरु आहे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे. आपण कशाला झाकायचे त्यांच्या पक्षात, असंही सुळे म्हणाल्या.
ज्या दिवशी माझा भाऊ गेला. त्यानंतर मी यावर पडदा टाकला. माझा भाऊ गेला तेव्हाच विषय संपला. दादा होते तोवर चर्चा होती.
दुनियेला माहित होते, आम्ही काय करणार ते. माझा भाऊ गेला विषय संपला, अशी मोठी प्रतिक्रिया सुळेंनी यावेळी दिली आहे. त्यामुळे आता विलिनीकरणाच्या या सर्व चर्चांमध्ये सुप्रिया सुळेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
बातमी अपडेट होते आहे…