“राजू शेट्टी साहेब, तुम्ही या रणजितच्या जातीत का जन्माला आला नाहीत?”

हातकणंगले : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव झाला. धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला. या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रणजित बागल यांनी राजू शेट्टींना उद्देशून एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे, ज्या पोस्टची सध्या फेसबुकसह सर्वच सोशल मीडियावर जोरदार […]

राजू शेट्टी साहेब, तुम्ही या रणजितच्या जातीत का जन्माला आला नाहीत?
Follow us
| Updated on: May 24, 2019 | 2:38 PM

हातकणंगले : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव झाला. धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला. या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रणजित बागल यांनी राजू शेट्टींना उद्देशून एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे, ज्या पोस्टची सध्या फेसबुकसह सर्वच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. शिवाय, ही पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“साहेब तुम्ही का हो त्या जातीत जन्माला आला.. का तुम्ही या रंजीतच्या जातीत जन्माला आला नाहीत.. अहो आता जो निवडुन आलाय तो शिवरायांच्या विचारांवर चालनार आहे म्हणतोय पण त्यांनंच कारखाना हडप केला हे लोकांना समजलं नाही का..? त्याची जात तुमच्यापेक्षा वरचढ ठरली बघा.. साहेब तुम्ही आता आमच्यासाठी तुमचं रक्त नका वाया घालवुत.. आम्ही लाचार आहोत तसेच राहू लाचार आता इथुन पुढे तर गुलाम होवु आमच्या जातीचे…” असे म्हणत रणजित बागल यांनी राजू शेट्टी यांच्या विरोधकांना शालजोडे लगावले आहेत.

खासदार राजू शेट्टी यांची प्रतिमा ‘शेतकऱ्यांचा हक्काचा नेता’ अशीच आहे. राज्यासह देशभरातील अनेक शेतकरी आंदोलनांचं नेतृत्त्व राजू शेट्टी यांनी केले आहे. लोकवर्गणीतून निवडून येणारा आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणारा नेता म्हणूनही राजू शेट्टींची ओळख आहे. ऊसदराचा प्रश्न असो वा शेतीशी संबंधित इतर कुठलाही प्रश्न असो, राजू शेट्टी रस्त्यावर उतरण्यास तयार असतात. अशा नेत्याचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रणजित बागल यांच्या पोस्टमधून दिसून येते.

रणजित बागल यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी :

जेव्हा जेव्हा ऊस गव्हाणीत जाईल अन् शेतकरी पैशाची वाट पाहत राहिल.. खासदार साहेब शप्पथ तेव्हा तुमची आठवण आल्याशिवाय राहनार नाही.. आता जातीकडं बघुन दाबलेली बटनं दाबनारा जेव्हा घामाचे दाम न मिळालेल्यामुळे परवड होताना पाहुन हा शेतकरी साहेब नक्कीच तोंडात मारून घेतल्याशिवाय राहनार नाही.. ना भगवा दाम मिळवुन देईल ना हिरवा चारा मिळेल.. दुध पाण्याच्या मोलात विकु लागेल तेव्हा म्हशीच्या कासेला हात लावल्यालावल्या साहेब तुम्ही आठवनारंच.. साहेब आपल्याला नाकारलं आपण चुकलो आपण खरंच चुकलो.. लोकांना त्यांच्या पिकवलेल्या ऊसाची किंमत लक्षात आणुन देवुन चुकलो.. दरवर्षी लाखो रूपये फायदा शेतकर्यांच्या खिशात दिला हे चुकलंच आपलं.. हजारो किलोमीटर पायाला फोड येवुनही आपण चाललात.. अक्षरशः बेशुद्ध होईपर्यंत रणरणत्या उन्हात चाललात.. चुकलं साहेब तुमचं चुकलंच.. फुलेंचा आसुड या शासकांवर चालवुन शोषितांना न्याय दिला हे चुकलंच साहेब का बरं तुम्ही स्वतःचा घरसंसार स्वतःचं कौटुंबिक आयुष्य सोडुन आमच्या सारख्या या कृतघ्न लोकांसाठी लढत राहिलात.. ही लोकं उपकार विसरनारी आहेत साहेब ही लोकं आजचं बघतात साहेब.. नको होतं आयुष्य पणाला लावायचं हे लोकं असेच गंजुन पडायला हवे होते.. अशाचं घराघरातल्या मुलांमुलांसाठी नको होतं तुम्ही लढायला.. साहेब का हो तुम्ही लढलात आमच्यासाठी मुळात आम्हीच स्वार्थी ओ.. आम्हाला आमच्या जातीचा खासदार पाहिजे होता कारण तो उद्यापासून आमच्या घरात टोपल्यात भाकरी देवुन जानार होता.. तो आमच्या तिजोरीत पैसे देवुन जानार होता तो आमच्या ऊसासाठी रस्त्यावर उतरनार आहे.. तो आमच्या ऊसदरप्रश्नी उपोषणाला बसनार आहे.. तो आमच्या जातीतल्या प्रत्येक तरूणाला भरगच्च कमाईची नोकरी देनार आहे.. साहेब तुम्ही का हो त्या जातीत जन्माला आला.. का तुम्ही या रंजीतच्या जातीत जन्माला आला नाहीत.. अहो आता जो निवडुन आलाय तो शिवरायांच्या विचारांवर चालनार आहे म्हणतोय पण त्यांनंच कारखाना हडप केला हे लोकांना समजलं नाही का..? त्याची जात तुमच्यापेक्षा वरचढ ठरली बघा.. साहेब तुम्ही आता आमच्यासाठी तुमचं रक्त नका वाया घालवुत.. आम्ही लाचार आहोत तसेच राहू लाचार आता इथुन पुढे तर गुलाम होवु आमच्या जातीचे….. तुमचाच रणजित

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.