पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?; पैशांबाबत साक्षीदार स्वप्ना पाटकरांचा गंभीर आरोप?

राऊत यांच्या जामिनाला ईडीकडून (ED) जोरदार विरोध होत आहे. तर दुसरीकडे सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकरांनी संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केला आहे.

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?; पैशांबाबत साक्षीदार स्वप्ना पाटकरांचा गंभीर आरोप?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2022 | 8:38 AM

मुंबई :  पत्राचाळ (Patrachal) प्रकरणात सध्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) न्यायालयीन कोठडीत आहेत. सोमवारी त्यांच्या कोठडीत पुन्हा चौदा दिवसांची वाढ करण्यात आली आहे.  चार ऑक्टोबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र राऊत यांच्या जामिनाला ईडीकडून (ED) जोरदार विरोध होत आहे. तर दुसरीकडे सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकरांनी संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काय आहे स्वप्ना पाटकरांचा दावा?

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पत्राचाळ प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी मोठा दावा केला आहे. घोटाळ्यातील पैसे संजय राऊत यांनी बनावट कंपन्यात वळवले असल्याचा दावा पाटकरांनी केला आहे.  या आरोपानंतर आता संजय राऊत यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांच्या जामिनाला ‘ईडी’चा विरोध

दरम्यान दुसरीकडे सोमवारी संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपणार असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना जामीन देण्यास ईडीने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या न्यायलयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

आता संजय राऊत यांना 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जामीन मिळावा यासाठी संजय राऊत यांच्या वतीने विशेष न्यायालयात देखील जामीन अर्ज करण्यात आला होता. मात्र संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीने विरोध केला आहे.

एकीकडे राऊत यांच्या जामिनाला असलेला ईडीचा विरोध तर दुसरीकडे सुत्रांच्या माहितीनुसार  पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी  संजय राऊतांविरोधात केलेले गंभीर आरोप यामुळे राऊत यांच्या जामिनाचा मार्ग आता अधिक कठीण होण्याची शक्यता आहे.