मोदीजी, पाकिस्तानवर कारवाई करा, मुसलमान तुमच्यासोबत असेल : ओवेसी

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या विराट सभेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. मुस्लिमांच्या आजच्या परिस्थितीला संपूर्णपणे काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय भाजप नेत्यांनी गेल्या चार वर्षात मुस्लिमांविरोधात हवी ती वक्तव्य केली, असा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पुलवामा हल्ल्याचा निषेध करत आम्ही सरकारसोबत असू, असंही …

मोदीजी, पाकिस्तानवर कारवाई करा, मुसलमान तुमच्यासोबत असेल : ओवेसी

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या विराट सभेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. मुस्लिमांच्या आजच्या परिस्थितीला संपूर्णपणे काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय भाजप नेत्यांनी गेल्या चार वर्षात मुस्लिमांविरोधात हवी ती वक्तव्य केली, असा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पुलवामा हल्ल्याचा निषेध करत आम्ही सरकारसोबत असू, असंही ओवेसी म्हणाले.

मुंबईतील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची विराट सभा झाली. भारिपचे प्रकाश आंबेडकरांसह एमआयएमचे राज्यातील दोन आमदार या सभेसाठी उपस्थित होते. मला काही नकोय, पण आंबेडकरांना निवडून द्या, त्यांच्यासाठी मी इथे आलोय, असं ओवेसी म्हणाले. शिवाय मोदी नको, राहुल नको, देशाला प्रकाश आंबेडकरांची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पुलवामा हल्ल्याला पूर्णपणे पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्तान संपून जाईल, पण हिंदुस्तान कायम असेल. पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या, या देशातील मुसलमान सरकारच्या सोबत असेल, अशी ग्वाही ओवेसींनी दिली. शिवाय पुलवामा हल्ल्यात वापरलेली स्फोटकं आलीच कशी, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ओवेसींनी केली.

पाहा संपूर्ण भाषण :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *