AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! निवडणूक निकालामध्ये मोठा उलटफेर, वारं फिरलं केरळसोबतच आता काँग्रेस याही राज्यात सत्तेत येणार?

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालांचे कल हाती येत आहेत. अद्याप फायनल निकाल हाती आलेला नाहीये. मात्र आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर काँग्रेसला देखील मोठं यश मिळालं आहे.

मोठी बातमी! निवडणूक निकालामध्ये मोठा उलटफेर, वारं फिरलं केरळसोबतच आता काँग्रेस याही राज्यात सत्तेत येणार?
congressImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 04, 2026 | 5:24 PM
Share

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीमध्ये भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमताच्या दिशेनं सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर आसमामध्ये पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवण्यात भाजपनं यश मिळवलं आहे. मात्र दुसरीकडे तामिळनाडूनमध्ये मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने डीएमके आणि एडिएमके यांना मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार थलपती विजय यांचा पक्ष तामिळनाडूमध्ये 110 जागांवर आघाडीवर आहे. मात्र तरी देखील अजूनही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये.

याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे थलपती विजय यांचे वडील एसए चंद्रशेखर यांनी काँग्रेसला टीव्हीके सोबत (TVK) युती करण्याचं आमंत्रण दिलं आहे. काँग्रेसला सत्ता स्थापनेचं आमंत्रण देताना एसए चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसने इतर पक्षांना पाठिंबा देऊन स्वत:ची ताकद कमी करून घेतली आहे. मात्र आता आम्हाला पाठिंबा देऊन काँग्रेसला आपला पक्ष बळकट करण्याची मोठी संधी आहे.

थलपती विजय यांचे वडील नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचा एक गौरवशाली इतिहास आहे, मात्र एवढा मोठा इतिहास आणि पक्ष असून देखील काँग्रेस पक्ष कमजोर झाला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव होत आहे. काँग्रेसकडून सातत्याने इतर पक्षांना सत्तेसाठी पाठिंबा दिला जात आहे, मात्र यामध्ये त्यांचं नुकसान होत आहे. त्यांनी आमच्यासोबत युती करावी, त्यांच्याकडे त्यांचा पक्ष मजबूत करण्याची ही मोठी संधी आहे, असं थलपती विजय यांचे वडील एसए चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता काँग्रेस थलपती विजय यांच्या वडिलांचा प्रस्ताव स्विकारून सत्तेत येणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे केरळमध्ये मात्र काँग्रेसने डाव्यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. केरळमध्ये काँग्रेसची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे सुरू आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!