Pune: उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी शिक्षकाने सोडली नोकरी, आता पूर्णवेळ शिवसेनेचं करणार काम, राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jul 29, 2022 | 4:14 PM

शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख खरात यांच्या राजीनाम्यात आहे. खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत होते. गेली वीस वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून ते नोकरी करीत आहेत.

Pune: उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी शिक्षकाने सोडली नोकरी, आता पूर्णवेळ शिवसेनेचं करणार काम, राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल
उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी गुरुजी मैदानात
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

इंदापूर – राज्यात शिवसेनेत (Shiv Sena)झालेलं बंड, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यासोबत गेलेले ४० ते ५० आमदार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सघर्ष.. या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवरही होतो आहे. प्रत्येक जण या राजकीय परिस्थितीचा विचार करताना दिसतो आहे. यात इंदापूर परिसरातील एका शिक्षकाने नोकरीचा राजीनामा (teacher resign)देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यापुढे शिवसेना पक्षाचे पूर्मवेळ काम करणार असल्याची घोषणाही या शिक्षकाने करुन टाकली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती पाठिंबा मिळतो आहे, हे यातून स्पष्ट दिसते आहे.

शिक्षकाच्या राजीनाम्याची चर्चा

दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख खरात यांच्या राजीनाम्यात आहे. खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत होते. गेली वीस वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून ते नोकरी करीत आहेत. आता शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी खरात यांनी नोकरी सोडली आहे. शिवसेना संघटनेचे पूर्णवेळ काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा संघर्ष

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर, आता संपूर्ण राज्यभरातील शिवसेना सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे राज्यभरात दौरे करत आहेत, करणार आहेत. उद्धव ठाकरे हेही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभराचा दौरा करुन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. येत्या काळात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका यांच्या निवडणुका आहेत. अशा काळात पक्ष संघटनेला अधिकाधिक वेळ देू शकणारे शिवसैनिक आणि नव्या दमाच्या नेत्यांची पक्षाला गरज लागणार आहे. त्यासाठीच खरात गुरुंजींनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

नव्या नेतृत्वाला संधी

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडींनंतर अनेक पातळ्यांवर नव्या नेतृत्वाचा विकास होण्याची संधी सध्या राज्यात दिसते आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे ग्रामीण भागातील नेतृत्व आता शिंदे गटाच्या दुसऱ्या फळीच्या नेतृत्वात आले आहे. शंभूराजे देसाई, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संतोष बांगर, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार हे आमदार आता शिंदे गटाचे प्रमुख नेते झाले आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागात नवं नेतृत्व उभे राहण्याची ही संधी आहे. यातून खरात गुरुंजीसारखे अनेक नवे चेहरे आगामी काळात राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.