Bihar : मोदींसमोर तेजस्वी यादवची बोबडी वळली, पाच मिनिटाच्या भाषणात, चार वेळेस तत पप, पाटण्यात नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 13, 2022 | 10:37 AM

तेजस्वी यादव यांच्या आधी विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी भाषण केले. यानंतर तेजस्वी यादव हे बोलण्यासाठी आले. मात्र, अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात तेजस्वी हे तब्बल चार वेळा अडकल्याने एकच चर्चा रंगलीयं. तेजस्वी यादव यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन मागण्या केल्या.

Bihar : मोदींसमोर तेजस्वी यादवची बोबडी वळली, पाच मिनिटाच्या भाषणात, चार वेळेस तत पप, पाटण्यात नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9
Follow us on

बिहार : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बिहार विधानसभेच्या शताब्दी वर्षाच्या समारोप समारंभाला उपस्थित होते. यादरम्यान आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav), राज्यपाल फागू चौहान, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. तेजस्वी यांनी पीएम मोदींसमोर सुमारे पाच मिनिटांचे भाषणही केले, ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. पाच मिनिटांच्या भाषणात (Speech) विरोधी पक्षनेते चारहून अधिक वेळा अडकल्याने चर्चेला उधाण आले, विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांनी हे सर्व भाषण लिहून आणले असताना देखील भाषादरम्यान त्यांचे तत पप सुरू होते.

मोदींसमोर बोलताना तेजस्वी यादवचे तत पप

तेजस्वी यादव यांच्या आधी विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी भाषण केले. यानंतर तेजस्वी यादव हे बोलण्यासाठी आले. मात्र, अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात तेजस्वी हे तब्बल चार वेळा अडकल्याने एकच चर्चा रंगलीयं. तेजस्वी यादव यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन मागण्या केल्या, त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची आणि बिहारमध्ये स्कूल ऑफ डेमोक्रसी अँड लेजिस्लेटिव्ह स्टडीज सुरू करण्याची मागणी केली. तेजस्वी म्हणाले की, पंतप्रधानांना विनंती करतो की स्कूल ऑफ डेमोक्रसी अँड लेजिस्लेटिव्ह स्टडीज सारखी संस्था बिहारमध्ये असायला हवी.

हे सुद्धा वाचा

तेजस्वी यादव यांनी मोदींकडे केल्या दोन मागण्या

तेजस्वी यादव यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन हा जन्मशताब्दी वर्ष सोहळा आणि देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाचा पहिला दौरा अधिक संस्मरणीय व्हावा ही आमची मागणी आहे, असे तेजस्वी यादव म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादव यांना एक मोठा सल्ला देखील दिलायं. तेजस्वी यांना पाहून पीएम मोदी म्हणाले की, तुमचे वजन कमी करा.

लालू प्रसाद यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली

पीएम मोदींनी तेजस्वीचे वडील लालू यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केलीयं. लालू प्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तेजस्वी यादव आणि पीएम मोदी यांच्यामध्ये काही वेळ संभाषण झाले.  74 वर्षीय माजी मुख्यमंत्री लालू यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.